विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधीत पुण्यातील खडक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपा अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात खडक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. पोलिसांनी केवळ साळगावकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर लिहून दिलेली तक्रार स्वीकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र साळगावकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, शिवाजी नगरमधील गणेश खिंड रस्त्यावर एक भूखंड आहे. या भूखंडाची मोजणी करण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणला आहे. मुळात ही मोजणी करता येत नाही. यासंबंधीची फाईल सरकारील कार्यालयात आहे. त्यावर अजित पवारांचं नावही आहे. मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहे. तसेच या प्रकरणाला मी विरोध करत आहे, त्यामुळे अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका आहे.

दरम्यान, रवींद्र साळगावकर यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. यासंबंधीचं वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjp workers registered complaint against ajit pawar khadak police station life threat asc
Show comments