काँग्रेसच्या पुढाकाराने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात या बंदला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत पिंपरी चौकात निदर्शने केली. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रेडसेपरेटरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. काही अपवाद वगळता शहरातील दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याचे दिसून आले.
पुण्यामधील बंद दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील परिस्थितीचा आढवा घेतानाचा एका पत्रकाराचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर ५८ हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून तीन हजारहून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. लक्ष्मी रो़डवरील पेट्रोल पंप बंद असल्याचे सांगत हा पत्रकार काँग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे आज पेट्रोल पंपही बंद असल्याचे सांगताना दिसतो. त्यानंतर हा पत्रकार जवळच उभ्या असणाऱ्या एका दुचाकीवरील पुणेकराकडे जात या बंदचा समान्यांना फटका बसत असून त्यांना याबद्दल काय म्हणाचे आहे जाणून घेऊयात असं म्हणत पुणेकर व्यक्तीची छोटी मुलाखत घेतो. हा पत्रकार त्या व्यक्तीला तुम्हाला काही त्रास आहे का असा प्रश्न विचारतो. या प्रश्नावर ही गाडीवरील व्यक्ती एकदम शांतेमध्ये, ‘काँग्रेसच त्रास आहे’ असं तीन शब्दातील उत्तर देताना दिसतो. त्यानंतर गोंधळलेला पत्रकार त्या व्यक्तीला काँग्रेसने सध्या भाजपमुळे महगाई वाढली आहे पेट्रोलचे भाव वाढलेत त्याबद्दल काय सांगाल असं विचारतो. यावरही तो व्यक्ती अगदी शांततेमध्ये, पेट्रोल १०० रुपये काय २०० रुपये असले तरी चालेल पण काँग्रेस नको असे उत्तर देतो.
Bwahahahahaha pic.twitter.com/z9AxkoBQ4M
— Suresh Nakhua (@SureshNakhua) September 10, 2018
काँग्रेसबद्दलचे या व्यक्तीने व्यक्त केलेले हे मत सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून तो आपल्या प्रोफाइलवर पीन करुन ठेवला आहे. अनेकांनी या व्हिडीओलावर गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात कोण काय म्हणाले आहे या व्हिडीओबद्दल.
इंटरनेटवरील सर्वोत्तम व्हिडीओ
Hahahahahahaha…..THIS has to be the BEST video on internet today!!
— Rita Singh (@Rita_2110) September 10, 2018
हे पुणे आहे…
This is Pune…Jai Maharashtra
— Vikrant Dhepe (@DhepeVikrant) September 10, 2018
अशा लोकांमुळेच पुणे देशातील सर्वोत्तम शहर ठरले आहे
People like these are the reason why Pune is the best city to live in India
— Rushi Vyas (@Rushivyas1994) September 10, 2018
जिंकलस भावा
Bhai ne Dil Jeet liya. Petrol 200 Chalega lekin congress nahi chahiye. @TajinderBagga
— Ganesh shankar Singh (@gssingh86) September 10, 2018
सीधी बात नो बकवास
सीधी बात नो बकवास
— (Atal) Neeraj Sharma (@Neeraj0702) September 10, 2018
पुण्यामध्ये काल भारत बंदमुळे अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पुणे शहरातील मार्केटयार्ड १० नंबर प्रवेशद्वारे, चित्रशाळा, पंपिंग स्टेशन, नळस्टॉप, गुजरात कॉलनी, महानगरपालिका, संघर्ष चौक आदी ठिकाणी बसेसची तोडफोड झाली.