Pune Woman Duped: ऑनलाईन घोटाळ्यांना बळी न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केलं जात आहे. मात्र, त्यानंतरही फोनवर, ऑनलाईन पद्धतीने घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. अजूनही अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडत असून त्यांना फक्त अशिक्षितच नव्हे, तर सुशिक्षित व्यक्तीही बळी पडत असल्याचं समोर येत आहे. पुण्यात नुकतीच अशीच एक घटना समोर आली असून तिथे चक्क एका निवृत्त महिला बँक मॅनेजरलाच भामट्यांनी तब्बल २ कोटी २२ लाखांना गंडा घातल्यां स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारे भामटे सदर महिलेला भारतीय जनसंघाचे दिवंगत नेते दीन दयाल उपाध्याय यांचं नाव घेऊन फसवत होते, अशी बाब उघड झाली आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या ६२ वर्षीय निवृत्त बँक मॅनेजर महिलेची २ कोटी २२ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड पोलिसांत दाखल झाली आहे. गुरुवारी यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. गेल्या वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने ही फसवणूक चालू होती, अशी बाबही तक्रारीतून समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित महिलेला तब्बल १९ वेगवेगळ्या प्रकारच्या नावांनी फोन करून फसवल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या सविस्तर वृत्तात नमूद केलं आहे. यामध्ये सरकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी ते थेट अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंतच्या ओळखी सांगण्यात आल्या.

Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Torres Jewellery Scam Updates| ED Raids 10 Locations in Mumbai
ED Raids in Mumbai : टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, जयपूरसह १० ठिकाणी छापेमारी
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
Retired Soldier Kills Wife, Disposes of Body Parts in Hyderabad Lake
Crime News : याला माणूस तरी कसं म्हणावं? पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, निवृत्त जवानाचे क्रूर कृत्य
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Saif Ali Khan Attacked
Saif Ali Khan Attacked : तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर

कशी झाली फसवणूक?

हा फसवणुकीचा प्रकार २०२३ च्या शेवटच्या काही महिन्यांपासून अगदी अलिकडच्या काही दिवसांपर्यंत चालू असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या संपूर्ण काळात तक्रारदार महिलेला संबंधित व्यक्तींकडून वारंवार फोन केले जात होते. “त्या व्यक्तींनी सदर महिलेला वारंवार फोन करून वेगवेगळ्या विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी सांगितलं. त्यातून मोठ्या रकमेचा परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. त्यासाठी जीएटी, प्राप्तिकर, टीडीएस, हस्तांतर शुल्क, व्हेरिफिकेशन शुल्क, ना हरकत प्रमाणपत्र शुल्क या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आली”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांनी सदर महिलेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NCPI), इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (IRDAI) आणि थेट केंद्रीय अर्थमंत्रालयातूनही बोलत असल्याचं सांगणाऱ्या व्यक्तींचे फोन आले. या व्यक्तींनी तक्रारदार महिलेला त्यांनी आधी पाठवलेल्या पैशांबाबत घाबरवलं. ‘तुम्ही आधी पाठवलेले पैसे घोटाळ्यात अडकले आहेत’, असं सांगून ते पैसे सोडवण्यासाठी अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. त्यातून पुन्हा एकदा सदर महिलेनं पैसे गमावले.

यावेळी मात्र आपली फसवणूक होत असल्याची खात्री पटल्यानंत सदर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

Story img Loader