Accused Dattatraya Gade Arrested Highlights: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी शिरूर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव दत्तात्रेय गाडे आहे, त्याला पुणे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप दत्तात्रेय रामदास गाडे (३७) यांच्यावर आहे. या घटनेबाबत सर्व घडामोडी या ब्लॉगमधून जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Accused Dattatraya Gade Arrested Highlights: पुणे बलात्कार प्रकरणाबाबतच्या लाईव्ह अपडेट्स.

Live Updates
15:08 (IST) 28 Feb 2025

Pune Swargate Rape Case LIVE Update: पुणे बलात्कार प्रकरणात आरोपीच्या शोधमोहिमेवरून श्रेयवाद? पोलीस आयुक्त म्हणाले, “काही अधिकारी…”

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे बलात्कार झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी या प्रकरणी आंदोलन केल्यानंतर तपासाला वेग आला अन् आज पहाटे त्याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली आहे. ड्रोनची नजर, पोलीस पथकांचं शौर्य अन् श्वान पथकांच्या कामगिरीमुळे उसाच्या शेतात लपून बसलेला आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली. मात्र, आता यावरून श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 28 Feb 2025

Pune Swargate Rape Case LIVE Update: आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? आरोपीला कसं पकडलं? कोण-कोणत्या डिटेल्स समोर आल्या? फडणवीसांनी दिली मोठी माहिती

पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर केला. अखेर आज आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? पोलिसांनी आरोपीला कसं शोधून काढलं? तसेच या प्रकरणातील कोण-कोणत्या डिटेल्स आतापर्यंत समोर आल्या आहेत? यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 28 Feb 2025
Pune Swargate Rape Case LIVE Update: पुणे बलात्कार प्रकरणी आरोपी गाडेला २ वाजता न्यायालयात हजर करणार

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला दुपारी २:०० वाजता न्यायालयात हजर केले जाणार असल्याने पुणे न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

12:31 (IST) 28 Feb 2025

Pune Swargate Rape Case LIVE Update: “महिलांना सुरक्षा देण्यात सरकार असमर्थ”, पुणे बलात्कार प्रकरणावरून काँग्रेसची टीका

पुणे बलात्कार प्रकरणावरून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यातून सरकारचे अपयश दिसून येते. बदलापूर प्रकरणात बनावट चकमक झाली, उच्च न्यायालयानेही निरीक्षण नोंदवले. महिलांना सुरक्षा देण्यात सरकार असमर्थ आहे हे सरकारचे अपयश आहे…”

12:06 (IST) 28 Feb 2025

शेवटची टिप देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपये, स्थानिकांचा करणार सत्कार; पुणे पोलीस आयुक्तांनी नेमकं काय सांगितलं?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका पडीक शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त झाल्या. या पार्श्वभूमीवर घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेच्या अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला. शेवटी त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानिक नागरिकांचे आभार मानले असून ते त्यांच्या सत्कारासाठी गुणाट गावात जाणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 28 Feb 2025

Pune Swargate Rape Case LIVE Update: “आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ, आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शंका”, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकातील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याची माहिती आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 28 Feb 2025

Pune Swargate Rape Case LIVE Update: गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीला अटक, पोलीस आयुक्त करणार ग्रामस्थांचा सन्मान

स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “आरोपीला काल रात्री १:१० च्या सुमारास गुणत गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. गुणत गावातील लोकांनी आम्हाला आरोपीला पकडण्यास मदत केली. औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, त्याला अटक करण्यात आली आणि आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल. एक विशेष वकील नियुक्त केला जाईल आणि आम्ही खटला जलदगतीने चालवण्याचा प्रयत्न करू. पुणे पोलिसांच्या वतीने गुणतच्या लोकांचे मी आभार मानतो. आम्हाला मदत करणाऱ्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यासाठी मी गावाला भेट देणार आहे.”