बालवाडीत शिकणाऱ्या मुलीची आत्या असल्याची बतावणी करुन बालवाडीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेचा डाव आजीच्या प्रसंगवधानामुळे उधळला गेला. खडकीतील एका शाळेच्या आवारात ही घटना घडली. छाया युवराज शिरसाट (वय २८, रा. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरसाट मूळची अकोल्याची आहे. पतीपासून ती वेगळी राहत आहे. खडकीतील एका शाळेत फिर्यादीची मुलगी आणि पुतण्या शिकायला आहे. फिर्यादीची आई मुलांना शाळेत सोडते. शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी घेऊन फिर्यादीची आई जाते. दोन दिवसांपूर्वी सकाळी अकराच्या सुमारास बालवाडीतील मुलांना सोडण्यात आली. त्यावेळी छाया शिरसाट प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना भेटली. तिने मुलीची आत्या असल्याचे तिने सुरक्षारक्षकांना सांगितले. त्यानंतर मुलीला शाळेतून घेऊन ती निघाली. त्या वेळी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या आजीने शिरसाटला नातीला घेऊन जाताना पाहिले.

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

आजीने शिरसाटकडे विचारणा केली. तेव्हा तिने मी मुलीची आत्या असल्याचे तिने आजीला सांगितले. त्यानंतर आजीने सुरक्षारक्षकांना हा प्रकार सांगितले. आजीने शिरसाटला पकडून सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत पतीपासून वेगळे राहत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे, असे खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune the plan to abduct a schoolgirl was foiled due to the incident of the grandmother pune print news msr