Pune Assembly Election Result Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.
Pune Assembly Election Results Live Updates : पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Junnar Assembly Election results 2024 : जुन्नर मतदारसंघ
Pune Assembly Election Results Live Updates : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघाची नावे खालीलप्रमाणे -
Pune Vidhan Sabha Election Results Live Updates: पुणे जिल्हातील एकूण मतदारसंघ
Pune Vidhan Sabha Election Results Live Updates : पुणे जिल्ह्यात एकूण २१ मतदारसंघ आहे. त्यातील ८ मतदारसंघ हे पुणे शहरातील आणि इतर १३ मतदारसंघ हे ग्रामीण भागातील आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.