Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.

Live Updates

Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

11:38 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : भोसरी विधानसभा पाचवी फेरी

महेश लांडगे- महायुती- ४९,१३५

अजित गव्हाणे- महाविकास आघाडी- ३३,७७५

महेश लांडगे -१५,३६०मतांनी आघाडीवर

11:36 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : पिंपरी विधानसभा अकराव्या फेरी अखेर

राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे हे २४,०९० मतांनी आघाडीवर

बनसोडे यांना एकूण मते ६३१६३

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ३९०७३

11:36 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : 195 जुन्नर विधानसभा निकाल 11 वी फेरी

अतुल बेनके (महायुती)- 24105

सत्यशिल शेरकर ( महाविकास आघाडी) – 30467

शरद सोनवणे ( अपक्ष ) – 40680

देवराम लांडे ( वंचित )- 17831

आशाताई बुचके ( अपक्ष )- 4103

11 वी फेरीत शरद सोनवणे आघाडीवर

11:29 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : पर्वती मतदारसंघ आठवी फेरी

भाजपच्या माधुरी मिसाळ २० हजार मतांनी आघाडीवर

माधुरी मिसाळ (भाजप) : ४६६७६

अश्विनी कदम ( राष्ट्रवादी शरद पवार ) : २६७६४

11:29 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : भोसरी विधानसभा- महेश लांडगे १३,०९८ मतांनी आघाडीवर

चौथी फेरी-

– महेश लांडगे- महायुती- ४०,१२४

– अजित गव्हाणे- महाविकास आघाडी- २७,०२६

महेश लांडगे- १३,०९८ मतांनी आघाडीवर

11:25 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : भोसरी विधानसभा- महेश लांडगे ११,०८४ मतांनी आघाडीवर

तिसरी फेरी-

– महेश लांडगे- महायुती- ३१,२७०

– अजित गव्हाणे- महाविकास आघाडी- २०,१८६

11:25 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : मावळ २१वी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ८५,०२१ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण १,४२,६९३मते

अपक्ष – बापू भेगडे – ५७,६६७

11:25 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : खडकवासला ८ वी फेरी : भीमराव तापकीर ११ हजार ४९४ मतांनी आघाडीवर

11:24 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : मावळ विधानसभा: सुनील शेळकेंची विजयाकडे घोडदौड सुरू; ७६ हजार मतांनी आघाडीवर

मावळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. अठराव्या फेरी अखेरीस सुनील शेळके यांना हे ७६ हजार मतांची आघाडी आहे. सुनील शेळके यांना १ लाख २४ हजार १९१ तर अपक्ष बंडखोर बापू भेगडे यांना ४७ हजार ८८७ मतं मिळालेली आहेत.

मावळ विधानसभा मतदारसंघात बंडखोर बापू भेगडे यांना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पाठिंबा दिल्याने मावळ मधील ही निवडणूक अत्यंत आव्हानात्मक होईल असं वाटत होतं. परंतु, आत्तापर्यंत च्या निकालाची आकडेवारी बघता सुनील शेळके यांची विजयाकडे घोडदोड सुरू आहे. अठराव्या फेरीअखेरीस सुनील शेळके यांना ७६ हजार ३०४ मतांची आघाडी आहे. मावळमधून सुनील शेळके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

महायुतीकडून सुनील शेळके यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील बापू भेगडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बापू भेगडे यांना मावळ मधील भाजपने देखील पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल असं बोललं जात होतं. शरद पवार यांनी देखील बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. बापू भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात वेळोवेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मावळ विधानसभेबाबत स्थानिक देखील बोलायला तयार नव्हते.

11:19 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : मावळ विसावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ८३,१७४ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण १,३७,१४६मते

अपक्ष – बापू भेगडे – ५३,९७२

11:17 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : भोसरी मतदारसंघ चौथी फेरी अखेर

भाजपचे महेश लांडगे आघाडी १३,०९८

लांडगे यांना एकूण ४०,१२४मते

राष्ट्रवादी (शरद पवार) अजित गव्हाणे २७,०२६

11:11 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील सद्यस्थिती

भाजप – सात जागांवर आघाडी

राष्ट्रवादी (अजित पवार) – आठ जागांवर आघाडी

राष्ट्रवादी (शरद पवार) – एका जागेवर आघाडी

काँग्रेस – दोन जागांवर आघाडी

शिवसेना शिंदे – एक जागा

शिवसेना ठाकरे – एक जागा

अपक्ष – एक जागा

11:10 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : भोसरी मतदारसंघ तिसऱ्या फेरी अखेर

भाजपचे महेश लांडगे आघाडी ११,०८४

लांडगे यांना एकूण ३१,२७० मते

राष्ट्रवादी (शरद पवार) अजित गव्हाणे २०,१८६

11:08 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : चिंचवड ९ फेरी

भाजपचे शंकर जगताप ३७ हजार २८९ मतांनी आघाडीवर

11:02 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : मावळ सतरावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ७२,८३६ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण १,१७,९०५मते

अपक्ष – बापू भेगडे – ४५,०६९

11:01 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : भोसरी विधानसभा दुसरी फेरी-

महेश लांडगे- महायुती- १९,३९५

अजित गव्हाणे- महाविकास आघाडी- १२,१३०

महेश लांडगे -१०,१९५ मतांनी आघाडीवर

10:58 (IST) 23 Nov 2024

Pimpri Assembly Election Results Live Updates :पहिली फेरी

– अण्णा बनसोडे- महायुती – ७,४८४

– सुलक्षणा शिपवंत- महाविकास आघाडी- ३,४६६

-अण्णा बनसोडे – ४,०१८ मतांनी आघाडीवर

10:58 (IST) 23 Nov 2024

Chichwad Assembly Election Results Live Updates: चिंचवड विधानसभा भाजपचे शंकर जगताप आघडीवर

10:57 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Results Live Updates :पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरी अखेरीस काँग्रेसचे रमेश बागवे ८३२ मतांनी आघाडीवर

10:56 (IST) 23 Nov 2024

Bhosri Assembly Election Results Live Updates :भोसरी विधानसभा

दुसरी फेरी

भोसरी विधानसभा भाजप चे महेश लांडगे आघडीवर

४९१७ मतांनी महेश लांडगे आघाडीवर

शरद पवार गटाचे अजित गव्हाणे पिछावर

10:53 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Results Live Updates : खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके यांना ४७७६ मतं तर भीमराव तापकीर यांना ४१७१ मतं,महाविकास आघाडीचे सचिन दोडके आघाडीवर

10:53 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : पिंपरी विधानसभा सहाव्या फेरी अखेर

राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे हे १७,६९६ मतांनी आघाडीवर

बनसोडे यांना एकूण मते ४५७८९

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – २८,०९३

10:52 (IST) 23 Nov 2024

Maval Assembly Election Results Live Updates : मावळ विधानसभा : चौथ्या फेरी अखेर

-सुनील शेळके (महायुती) : २४६१७

-बापू भेगडे( अपक्ष) : ९६७१

-सुनील शेळके १४,९४६ मतांनी आघाडीवर

10:52 (IST) 23 Nov 2024

Chichwad Assembly Election Results Live Updates :चिंचवड विधानसभा

शंकर जगताप – bjp ११४४२

राहुल कलाटे- sp ५८१२

७६१० – आघाडीवर

10:48 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Result 2024 : मावळ पंधरावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ६४,३३१मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण १,०३,४२४मते

अपक्ष – बापू भेगडे – ३९,०९३

10:47 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : मावळ चौदावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ६०,६३४ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण ९५,८७९ मते

अपक्ष – बापू भेगडे – ३५,२४५

10:44 (IST) 23 Nov 2024

Kasba Assembly Election Results Live Updates :कसबा विधानसभा मतदार संघ दुसरी फेरी रविंद्र धंगेकर २३२८, हेमंत रासने ५६५७ यामुळे दुसर्‍या फेरी अखेर २७४९ ने हेमंत रासने आघाडीवर

10:44 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Results Live Updates: चेतन तुपे दुसर्‍या फेरी अखेर ३५०० मतांनी पुढे

10:44 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result 2024 : मावळ चौदावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ६०,६३४ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण ९५,८७९ मते

अपक्ष – बापू भेगडे – ३५,२४५

10:41 (IST) 23 Nov 2024

Election Result 2024 : वडगाव शेरी सुनील टिंगरे सहाव्या फेरी अखेर १६ हजारांनी आघाडीवर

पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.