Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.

Live Updates

Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

09:36 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : मावळ सहावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके – ३९,६८४

अपक्ष – बापू भेगडे – १४,३३४

शेळके आघाडी – २५,३५०

09:34 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : खडकवासला मतदारसंघ तिसऱ्या फेरी अखेर भीमराव तापकीर दीड हजाराचे मताधिक्य

09:33 (IST) 23 Nov 2024

maharstra assembly election : चिंचवड तिसरी फेरी

भाजप शंकर जगताप – ८२९५

राष्ट्रवादी (शरद पवार) राहुल कलाटे – ४५३१

आघाडी – जगताप – ११,३७४

09:32 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : भोसरी विधानसभा दुसरी फेरी

भाजपचे महेश लांडगे ४९१७ मतांनी आघाडीवर

शरद पवार गटाचे अजित गव्हाणे पिछाडीवर

09:30 (IST) 23 Nov 2024

pune assembly election updates : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे हेमंत रासने 2749 मतांनी आघाडीवर

09:30 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : पिंपरी मतदार संघ

तिसरी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) -अण्णा बनसोडे १९,७५९

राष्ट्रवादी (शरद पवार) सुलक्षणा शीलवंत – ९८९२

अण्णा बनसोडे ९८६७ मतांनी आघाडीवर

09:29 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे विधानसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत आहे

09:28 (IST) 23 Nov 2024

maharashtra assembly election : मावळ चौथी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके – २४,६१७

अपक्ष – बापू भेगडे – ९६७१

शेळके आघाडी – १४,९४६

09:26 (IST) 23 Nov 2024

Kasba Assembly Election Result Live Updates : कसब्यातून हेमंत रासने आघाडीवर

Kasba Assembly Election Result Live Updates : कसब्यातून हेमंत रासने (भाजप) आघाडीवर आहे

09:24 (IST) 23 Nov 2024

पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ आघाडीवर : Pune Assembly Election Results Live Updates

Pune Assembly Election Results Live Updates : पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ (भाजप) आघाडीवर आहे.

09:17 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Result : महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

वाचा सविस्तर –

09:13 (IST) 23 Nov 2024

pune assembly election updates : मावळ मतदारसंघ

तिसरी फेरी

सुनील शेळके (अजित पावर गट) : १७०३८

बापू भेगडे (अपक्ष) : ७०६८

आघाडी

अजित पवार गटाचे सुनील शेळके ९९७०

मतांनी आघाडीवर

09:11 (IST) 23 Nov 2024

Murbad Assembly Constituency: पहिल्या फेरीनंतर किसन कथोरे ३७०१ आघाडीवर

किसन कथोरे (भाजप) – ८२०५

सुभाष पवार राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.)- ४५०४

09:09 (IST) 23 Nov 2024

Ovala Majivada constituency Election Results Live Updates 2024 : ओवळा माजीवडा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक ५९६८ मतांनी आघाडीवर

-प्रताप सरनाईक( शिंदेंची शिवसेना) ८२३१

-नरेश मनेरा (ठाकरे गट) २२६३

-संदीप पाचंगे (मनसे) ३०६

09:09 (IST) 23 Nov 2024

pune assembly election : पुणे ब्रेकिंग

पुण्यात सुरुवातीच्या पहिल्या फेरीमध्ये जवळपास सर्वच विद्यमान आमदार आघाडीवर

कोथरूड, कसबा, शिवाजीनगर वडगाव शेरी, पर्वती आणि हडपसर या सर्व मतदारसंघातून विद्यमान आमदारांची आघाडी

चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे हे आघाडीवर

09:08 (IST) 23 Nov 2024

pune assembly election updates : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे १५०० मतांनी आघाडीवर… सिद्धार्थ शिरोळे यांना ४१००, तर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना २६०० मते

09:03 (IST) 23 Nov 2024

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ६६५४

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ३१३५

आघाडी

अण्णा बनसोडे – ७५९७

08:55 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Results 2024 : कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीमध्ये साडेपाचशे मतांची आघाडी

08:51 (IST) 23 Nov 2024

Pune Vidhan Sabha Election Results 2024 : वडगाव शेरीमधून सुनिल टिंगरे आघाडीवर

Pune Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : वडगाव शेरीमधून सुनिल टिंगरे आघाडीवर आहे.

08:49 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Election Result Live Updates :मावळमध्ये सुनील शेळके पोस्टल मतमोजणीत आघाडीवर

08:48 (IST) 23 Nov 2024

पिंपरी विधानसभा

-पिंपरी विधानसभा अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आघडीवर

-४,३०० मतांनी अण्णा बनसोडे आघाडीवर

-शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत धर पिछाडीवर

08:40 (IST) 23 Nov 2024

Baramati Vidhan Sabha Election Result Live Updates : बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर

Baramati Election Results : मतमोजणीच्या पहिल्या कलात बारामतीतून राष्ट्रवादी – शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर आहे. अजित पवारांना धक्का बसला आहे.

08:32 (IST) 23 Nov 2024

भोसरी विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : Bhosari Assembly Election Result

Bhosari Assembly Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील भोसरी विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. यावेळी महायुती भोसरी विधानसभेसाठी महेश (दादा) किसन लांडगे यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील अजित दामोदर गव्हाणे यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात भोसरीची जागा भाजपाचे महेश (दादा) किसन लांडगे यांनी जिंकली होती.

08:01 (IST) 23 Nov 2024

Pimpri Election Results : पिंपरी मतदारसंघ

Pimpri Vidhan Sabha Election Result Live Updates : पिंपरीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे विरोधात शरद पवार गटाच्या सुलक्षिणा शिलवंत अशी लढत आहे. पिंपरीकरांचा कौल कुणाला, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

07:53 (IST) 23 Nov 2024

Chinchwad Election Results : चिंचवड मतदारसंघ

Chinchwad Vidhan Sabha Election Result Live Updates : चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार शंकर जगताप विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे उभे आहेत.

07:34 (IST) 23 Nov 2024

Pune Election Results 2024 : दौंड मतदारसंघ

दौंडमधील लढत भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या विरोधात माजी आमदार रमेश थोरात अशी होईल. थोरात हे महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात होते. मात्र, त्यांनी अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

07:25 (IST) 23 Nov 2024

पुणे शहरातील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

पुणे : मतमोजणी केंद्रावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी भेट दिली आणि अधिकारी, कर्मचारी वर्गाला आवश्यक त्या सूचना दिल्या. पुणे शहरातील कसबा, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला या आठ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे आठ वाजता सुरुवात होणार आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तर प्रत्येक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रतिनिधीची तपासणी करून आतमध्ये सोडले जात आहे.

07:25 (IST) 23 Nov 2024

Assembly Election results 2024 : पुरंदर मतदारसंघ

पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यात लढत दिसून येणार आहे.

07:19 (IST) 23 Nov 2024

Bhor Assembly Election results 2024 : भोर मतदारसंघ

भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार शंकर मांडेकर उभे आहेत.

07:12 (IST) 23 Nov 2024

Pune election results 2024 : शिरूर मतदारसंघ

शिरूरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात भाजपचे नेते प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली असली, तरी विद्यामान आमदार राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अशोक पवार आणि माऊली कटके यांच्यातच सामना रंगणार आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.