Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.
Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Assembly Election results 2024 : जुन्नर मतदारसंघ
जुन्नरमध्ये विद्यामान आमदार अतुल बेनके यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले सत्यशील शेरकर यांचे आव्हान असेल.
पुणे : कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम परिसरात मतमोजणी केंद्र
पुणे शहरातील कसबा, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला या आठ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम इथे मतमोजणी केंद्रावर ८ वाजता सुरुवात होणार आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. प्रत्येक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रतिनिधींची तपासणी करून मतमोजणी केंद्रावर सोडले जात आहे.
Khadakwasala Assembly Election Results 2024 : खडकवासला मतदारसंघ
खडकवासला मतदारसंघात भाजपच्या उमेदवार भीमराव तापकीर विरोधात पुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून सचिन दोडके उभे आहे.बंडखोरी झालेल्या पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ विरोधात विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम लढत आहे.
Assembly Election results 2024 : भोसरी मतदारसंघ
Assembly Election results 2024 : भोसरीमध्ये भाजपचे उमेदवार महेश लांडगे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गऱ्हाणे उभे आहेत.
Assembly Election results 2024 : पर्वती मतदारसंघ
Assembly Election results 2024 : बंडखोरी झालेल्या पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ विरोधात विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम लढत आहे.
Kothrud Assembly Election results 2024: कोथरूड मतदारसंघ
कोथरूडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे) पक्षात लढत होणार आहे. चंद्रकांत पाटील विरोधात शिवसेनेनी (ठाकरे) चंद्रकांत मोकाटे यांना उभे केले आहे.
Pune election results 2024 : काँग्रेस विरुद्ध भाजप
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघांतील लढत महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये यांच्यात आहे. त्यामध्ये कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांचा समावेश आहे.
Junnar Assembly Election results 2024 : जुन्नर मतदारसंघ
जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर आहेत. सत्यशील शेरकर काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
Pune Assembly Election Results Live Updates : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघाची नावे खालीलप्रमाणे –
पुणे शहरातील मतदारसंघ – वडगाव शेरी, शिवाजी नगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोनमेंट आणि कसबा पेठ
ग्रामीण भागातील मतदारसंघ – जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी
Pune Vidhan Sabha Election Results Live Updates: पुणे जिल्हातील एकूण मतदारसंघ
Pune Vidhan Sabha Election Results Live Updates : पुणे जिल्ह्यात एकूण २१ मतदारसंघ आहे. त्यातील ८ मतदारसंघ हे पुणे शहरातील आणि इतर १३ मतदारसंघ हे ग्रामीण भागातील आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.