पुण्याच्या लोहगाव परिसरात एका तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात वेगळीच माहिती समोर येत असून या तरुणाने आत्महत्येपुर्वी मद्य प्राशन केलं होतं तसंच त्यासोबत कबुतराच्या आठ अंड्यांचं ऑमलेट करुन खाल्लं होतं. त्यानंतर कबुतराची अंडी आणी नशा याचा विपरीत परिणाम होऊन त्याने नशेतच थेट आठव्या मजल्यावरुन उडी मारली अशी माहिती समोर येत आहे.

सविस्तर घटना –
अर्णव मुखोपाध्याय (वय 32) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो पुण्यात व्होडाफोन कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी संध्याकाळी फ्लॅटच्या खिडकीमध्ये कबुतरांनी घरटे बनलवे असून त्यामध्ये अंडी घातल्याचं त्याला समजलं. त्यानंतर त्याने घरट्यातून आठ अंडी काढून त्यांचं ऑमलेट बनवलं. कबुतराची अंडी खाण्यास त्याला पत्नीने विरोधही केला होता. मात्र अर्णवने तिचे काहीच ऐकलं नाही, असं समजतंय. काहीवेळानंतर तो विचित्र वागू व बोलू लागला. माझ्या अंगात कबुतराचे भूत आले आहे, असे म्हणून तो घरातच पळू लागला. त्याच्या अशा वागण्याने घाबरलेल्या पत्नीने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्याने फ्लॅटच्या गॅलरीचा दरवाजा उघडून आठव्या मजल्यावरुन उडी मारली. खाली पार्किंगमध्ये असलेल्या एका चारचाकी गाडीवर तो पडला, या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अर्णवच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, मागील दोन दिवसांपासून ते तणावाखाली होते. मंगळवारी घरात मद्यप्राशन केले होते. कबुतराच्या अंड्यांचे ऑमलेट खाल्ल्यामुळे त्यांनी अचानक मला भूत दिसत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर घरात आरडाओरडा करत त्यांनी हातात सूरी घेऊन त्या भुताचा पाठलाग सुरु केला. त्यांच्या आक्रमक पवित्र्याला पत्नी आवरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली.

अर्णव हा मूळचा कोलकत्याचा असून तो पुण्यात व्होडाफोन कंपनीत कार्यरत होता. त्याला अपत्य नाही, पत्नीसोबत लोहगाव परिसरात एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरील सदनिकेत तो राहत होता. अर्णवचे नातेवाईक कोलकाता येथून पुण्यात आले असून पोलिसांनी अर्णवचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. पुढील तपास विमाननगर पोलीस करीत आहेत.

Story img Loader