नगरच्या एमआयडीसी परिसरात दहा व बारा फूट लांबीचे दोन अजगर सर्पमित्र भावेश परमार यांनी रविवारी धाडसाने पकडून पुन्हा निसर्गात मुक्त केली. साईबनजवळ ही जोडी पकडण्यात आली. या दोन अजगरांनी साईबनच्या पिंजऱ्यातील ८ ते १० कबुतरे फस्त केली.
भावेशने सरपटणाऱ्या प्राण्यांना पकडण्याचे प्रशिक्षण तीन वर्षांपूर्वी घेतले. पकडलेल्या अजगराविषयी माहिती देताना त्याने सांगितले, की अजगर शांत व बिनविषारी आहे, परंतु गैरसमजातून त्याची हत्या केली जाते. हत्येमुळे तो दुर्मिळ होत चालला आहे. हा प्राणी स्वत:चा बजाव करण्यासाठी चावा घेतो. अशा प्राण्यांना मारणे कायद्याने गुन्हा आहे.
सध्या अशा सरपटणाऱ्या प्राण्यांना पकडून त्याचे विष काढून विकण्याचा धंदा काही जण करतात, त्यास आळा बसण्यासाठी वन विभागाने सर्प पकडण्याचे ज्ञान असणाऱ्या प्रामाणिक प्राणिमित्रांना ओळखपत्र वितरित करावे, त्यामुळे वाईट प्रवृत्तींना आळा बसेल. मुंबई, अमरावती, नागपूर येथील वन विभागाने अशी ओळखपत्रे दिली आहेत. मात्र नगरच्या विभागाने केवळ अर्ज भरून घेतले, पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे असे प्राणी पकडण्यावर मर्यादा येतात, असे मत भावेशने (मो. ८०८७०००१८७) व्यक्त केले.
एमआयडीसीतील अजगराची जोडी पुन्हा निसर्गात मुक्त
नगरच्या एमआयडीसी परिसरात दहा व बारा फूट लांबीचे दोन अजगर सर्पमित्र भावेश परमार यांनी रविवारी धाडसाने पकडून पुन्हा निसर्गात मुक्त केली. साईबनजवळ ही जोडी पकडण्यात आली.
First published on: 14-07-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Python pair free in nature of midc