MHT CET Results 2024 : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राज्य समाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) ही घेण्यात येते. यावर्षी या परीक्षेत राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. फेरपरीक्षा न घेता या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच एमएचटी-सीईटीमधील पर्सेंटाईल पद्धत बंद करून गुणांवर आधारीत मेरीट यादी असावी, अशी मागणी त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सीईटी सेलने अभियांत्रिकीसाठी एका पेपरसाठी २४ वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका दिल्या. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपरची पुन्हा तपासणी करायची असेल तर त्यासाठी एक हजार रुपयांचे शूल्क घेतले जाते. यावेळी १,४२५ विद्यार्थ्यांनी हरकत घेतली असून फेरतपासणीची मागणी केली आहे. याचा अर्थ सीईटी सेलने त्याप्रमाणात पैसे कमवले.

Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Shiv Sena Thackeray group Nashik municipal elections
नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणवाढीमुळे ‘या’ शाखांमध्ये प्रवेशासाठी गर्दी वाढणार; अशी आहे राज्यातील प्रवेशाची स्थिती

सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत ५४ चुका आहेत. ज्यांनी प्रश्नपत्रिका तयार केली, त्यांचीच आता परीक्षा घेण्याची वेळ आली आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भौतिकशास्त्राच्या एका प्रश्नात जे चार पर्याय दिले गेले होते, त्यापैकी एकही उत्तर बरोबर नव्हते.

सीईटी सेलकडून गुण दिले जात नाहीत तर पर्सेंटाईल दिले जाते. ज्यांना कमी गुण मिळाले आहेत, त्यांचे पर्सेंटाईल अधिक आहे. ज्यांचे गुण जास्त आहेत, त्यांना कमी पर्सेंटाईल कमी आहे. पर्सेंटाईल ठरविण्याचे नेमके निकष काय आहेत, याची माहिती सीईटी सेलने विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंनी सीईटी सेलच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचे सांगितले.

MHT CET 2024 Results : एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, यंदा किती विद्यार्थी १०० पर्सेंटाइलचे मानकरी?

ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे, त्यांचे एक हजार रुपयांचे शुल्क परत द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच पुढील वर्षापासून एमएचटी-सीईटीसाठी एकच प्रश्नपत्रिका देण्यात यावी. या वर्षी विधानसभेत आमचेच सरकार येणार असल्यामुळे आम्ही एकच प्रश्नपत्रिका ठेवू, असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिले. तसेच सीईटीचे जे आयुक्त आहेत, त्यांना निलंबित करावे अशीही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

Story img Loader