पुणे, नागपूर : आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र,  परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित ‘न्यासा’ कंपनीच्या कामाबाबत नाराजी प्रकट के ली होती. त्यानंतरही याच कं पनीद्वारे २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर नियोजनात झालेला नवा गोंधळ लक्षात येऊन उमेदवार चक्रावून गेले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज के ला असल्याने संबंधित विद्यार्थ्यांला एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे शक्य असताना दोन सत्रांतील परीक्षासाठी दोन वेगळ्या जिल्ह्य़ांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन परीक्षांसाठीचे शुल्क भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. 

दरम्यान, आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत गोंधळ झाला असल्यास प्रशासनाने बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी, अशी परखड भूमिका माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी समाजमाध्यमांद्वारे मांडली आहे.

सुधारणा कधी होणार?

निवडलेली कं पनी परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे सप्टेंबरमधील परीक्षाच्या गोंधळातून स्पष्ट झाले होते. तरीही त्याच कं पनीद्वारे परीक्षा का घेण्यात येत आहे, उमेदवारांबाबत आरोग्य विभाग, आरोग्यमंत्री राजेश टोपे सहानुभूती दाखवणार का, आरोग्य विभाग कधी सुधारणार, अशी संतप्त भावना उमेदवारांनी समाजमाध्यमांतून व्यक्त के ली आहे. तसेच एमपीएससीद्वारे परीक्षा घेणे शक्य असतानाही खासगी कं पनीद्वारे परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवालही विचारण्यात येत आहे.

विदर्भातील उमेदवाराला पुण्यात केंद्र..

नागपूर विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी अमरावती, नागपूर केंद्र निवडले; परंतु त्यांना पुणे, ठाणे केंद्र देण्यात आले आहे. पसंतीचे परीक्षा के ंद्र न मिळण्याचा प्रकार बऱ्याच उमेदवारांच्या बाबतीत घडला आहे.

संतापाचे दुसरे कारण..

सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांला कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. परीक्षेसाठीचे शुल्क भरलेले नसतानाही काही उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आल्याचा, काही उमेदवारांना एकाच पदाच्या परीक्षेसाठी दोन जिल्ह्य़ांत नावे आल्याचेही उमेदवारांचे म्हणणे आहे. 

नामुष्कीचा इतिहास..

’आरोग्य विभागाकडून गट क आणि गट डमधील पदांची भरती प्रक्रिया खासगी कं पन्यांद्वारे राबवण्यात येत आहे.

’या प्रक्रियेसाठी निवडलेली ‘न्यासा’ कं पनी काळ्या यादीतील असल्याचा आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.

’मात्र त्या वेळी परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्रांबाबत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question marks on the recruitment process of the health department zws