बार्शीतील अवलियाची करामत

बार्शी येथील एका अवलियाने इस्लाम धर्माचा पवित्र कुराण ग्रंथ आपल्या सुबक हस्ताक्षरात जशाच्या तशा स्वरूपात लिहून काढला आहे. हस्ताक्षराबरोबरच उत्कट व नाजूक नक्षीकामामुळे हा ग्रंथ खरोखर ठेवा बनला आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Amit Shah in shirdi
Amit Shah : “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं”, अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार; उद्धव ठाकरेंवरही टीका!
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावाने छपाई तंत्र पार बदलून गेले आहे. ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ याची अनुभूती आधनिक छपाई तंत्रज्ञानातून येते. परंतु, त्याचा मोह टाळून केवळ कुराण ग्रंथाच्या अभ्यासानंतर जडलेल्या भक्तीपोटी बार्शी येथील हाजी गुलाब बाबूलाल पठाण (७५) या वृध्दाने स्वहस्ताक्षरातून कुराण ग्रंथ हुबेहूब लिहून काढला आहे. एकूण ८४८ पाने व ४६६६ वाक्ये (आयते) व सुरे असलेल्या कुराण ग्रंथाचा हस्ताक्षरातील ठेवा प्रत्यक्ष नजरेखालून घालण्यासाठी धार्मिक व आध्यात्मिक  क्षेत्रातील मंडळी पठाण यांच्या भेटीसाठी गर्दी करीत आहेत.

हाजी गुलाब पठाण यांचे शिक्षण मराठीतून जेमतेम तिसरीपर्यंतच झाले आहे. पूर्वीची त्यांची दिनचर्या वेगळीच होती. त्यांना जवळपास सर्व प्रकारची व्यसने होती. त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाइकांच्यादृष्टीने ते वाया गेल्यात जमा होते. वयाच्या पन्नाशीत १९८६ साली ते योगायोगाने हाजी अय्याजूल कादरी रजवी या आध्यात्म गुरूच्या सहवासात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पठाण यांनी पन्नासाव्या वर्षी अरबी शिक्षणाचे धडे घ्यायला सुरूवात केली. दोन वर्षांंत अरबी भाषेत ते पारंगत झाले. कुराण ग्रंथ वाचताना त्यातील छोटी-छोटी वचने, सुरे व दुवा (प्रार्थना) गुलाब पठाण यांनी स्वहस्ताक्षरात लिहून शुद्धलेखनाचा सराव केला. ग्रंथ पठण व पाठांतराबरोबरच अरबी शुद्धलेखनावर पठाण यांनी हुकमत मिळविली. हस्ताक्षर व जोडीला जन्मजात कलेची प्रतिभा यामुळे पठाण यांनी कुराण ग्रंथ प्रत्यक्ष स्वहस्ताक्षरात लिहून काढण्याचा संकल्प सोडला. त्याच सुमारास त्यांना हाज यात्रा करता आली. प्रत्यक्ष मक्का येथे कुराण ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिण्याचा शुभारंभ करायचा संकल्प सोडला खरा; परंतु दुर्दैवाने तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर सोलापूर, उस्मानाबाद व कर्नाटकातील काही सुफीसंतांच्या दर्गाहमध्ये जाऊन गुलाब पठाण यांनी प्रेरणा घेत कुराण ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहून काढण्यास आरंभ केला. २१ महिने व ९ दिवसांत संकल्पाची पूर्ती झाली. वैशिष्टय़ म्हणजे मूळ कुराण ग्रंथातील ठरलेल्या पानातील मजकुराप्रमाणेच पठाण यांनी त्या त्या पानावर लेखन केले आहे. त्यात कसलीही तफावत नाही. आयुष्यात सर्वांच्या स्मरणात राहील, असे कार्य आपल्या हातून प्रत्यक्ष परमेश्वरानेच करून घेतले, अशी भावना हाजी पठाण व्यक्त करतात. बार्शीत त्यांचे स्वत:चे सायकल, मोटारसायकल दुरूस्तीचे गॅरेज असून शीतपेयांच्या विक्रीचाही व्यवसाय ते करतात.

 

Story img Loader