शहरातील गायकवाड चौक परिसरात मागील भांडणाची मिटवामिटवी सुरू असताना वाद उत्पन्न होऊन कार्यकर्त्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीन्वये पोलिसांनी एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनिल केदारे (४०) यांनी संदीप धिवर, प्रदीप धिवर, सतीश केदारे, नितीन केदारे यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. गायकवाड चौक येथे ही घटना घडली. रमेश केदारे यांच्याशी रेल्वे वर्कशॉप गेटजवळ झालेल्या भांडणाची मिटवामिटवी नगराध्यक्षांच्या घरासमोर सुरू असताना वरील व्यक्तींनी वर्कशॉप युनियनच्या वादातून फिर्यादीचे संदीप धिवर याने हात धरले तर प्रदीप धिवरने फिर्यादीच्या डोक्यावर वार केले. सतीश केदारे आणि नितीन केदारे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप धिवर यांनीही तक्रार दिली आहे. रमेश केदारे, संतोष खरे, भिमराव सातदिवे, मनिष केदारे, अनिल केदारे, सुनील केदारे, नितीन केदारे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. नगराध्यक्षांच्या घरासमोर या सर्वानी सायंकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आपणास व भाऊ यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.