विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आरोप
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे ही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ खडसे यांच्यातील तडजोड (डील) आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करण्याची धमक भाजपमध्ये नाही, असे ते म्हणाले.
विखे म्हणाले, भाजप आणि खडसे यांच्यातील तडजोडीनुसार खडसेंनी पक्ष फोडू नये,तूर्तास राजीनामा द्यावा, पक्षाची अब्रू जाऊ देऊ नये. या मोबदल्यात हे वर्ष संपण्यापूर्वीच सर्व आरोपातून ‘क्लीन चीट; देऊन खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. खडसेंवर कारवाई केली तर, पक्षात फूट पडेल, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळेच खडसेंचा राजीनामा घेण्यापूर्वी भाजपने विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचे अर्ज घेतले. खडसेंची भीती नसती तर कदाचित भाजपने ही निवडणूक बिनविरोध होवू दिली नसती, असे विखे म्हणाले. काँग्रेसने फक्त आरोप केले, पुरावे दिले नाहीत या खडसेंच्या विधानाचा विखे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले,ह्वदाऊदशी संभाषण झाले की, नाही याचा पुरावा दाऊदकडून आणायला आमच्याकडे दाऊदचा नंबर नाही. खडसे यांच्याकडे तो आहे. त्यांनी दाऊदला फोन करुन त्यांचे बोलणे झाले की, नाही हे जाहीर करायला सांगावे.ह्व भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, ही जमीन एमआयडीसीची आहे. यापेक्षा आणखी मोठा काय पुरावा असू शकतो, असा सवाल विखे यांनी केला. अंबरनाथ येथील जमिनीची किंमत ५ कोटी असताना त्यासाठी ३० कोटींची लाच कशी मागितली जाऊ शकते, असा खडसे यांचा दावा आहे. परंतु काँग्रेसच्याच प्रवक्यांनी महसूल विभागाची कागदपत्रे सादर करुन या जमिनीची किंमत तब्बल २२६ कोटी असल्याचे स्पष्ट केले. खडसेंना त्यांच्या अखत्यारीतील विभागाच्या कागदपत्रांवर विश्वास नाही, असाच याचा अर्थ होतो.

‘भाजपमध्ये धमक नाही’
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्ष खडसेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले, पण काल-परवापर्यंत खडसे यांची बाजू मांडायला त्यांचे पक्ष प्रवक्ते तयार नव्हते. आता तडजोड झाल्यानंतर भाजप अचानक खडसे यांच्या पाठिशी राहिला आहे. त्यामुळे भाजपची भ्रष्टाचाराबाबत अनास्था उघड झाली आहे. भ्रष्टाचाराविरुध्द कारावाई करण्याची भाजपची धमक नाही, असे विखे म्हणाले.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
BJP Nitesh Rane kerala mini pakistan statement
नितेश राणे यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ?
Story img Loader