अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आणि आजी महसुलमंत्र्यांच्या गटांमध्ये चुरशीची लढत झाली. अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मूळगावी म्हणजे जोर्वे येथे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा सरपंच निवडून आला आहे. त्यामुळेच थोरातांच्या गावात विखेंच्या गटाच्या विजयाची संगमनेर तालुक्यात जोरदार चर्चा आहे. असं असलं तरी ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीत थोरात गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे सरपंच विखे गटाचा आणि सदस्यांचं बहुमत थोरात गटाकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यात आज (२० डिसेंबर) ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने बहुसंख्य ठिकाणी विजय मिळवला आहे. मात्र, थोरातांच्या मूळगाव असलेल्या जोर्वे गावातच विखेंच्या जनसेवा विकास मंडळाचा सरपंच निवडून आला.

जोर्वे ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती जागा?

सरपंच – विखे गट
विखे गट ग्रामपंचायत सदस्य – ४
विखे गट ग्रामपंचायत सदस्य – ९

जोर्वे गावातील विजय उमेदवारांची यादी

संगमनेर तालुक्यात किती ग्रामपंचायतींची निवडणूक?

संगमनेर तालुक्यात एकूण ३७ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यापैकी सायखिंडी व डोळासने या दोन गावांमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीचा विचार करता संगमनेर तालुक्यात एकूण ३६७ सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ७३ सदस्य बिनविरोध निवडले गेले.

एकूण ग्रामपंचायत – ३७
एकूण प्रभाग संख्या – १३३
एकूण सदस्य संख्या – ३६७
एकूण मतदार – ९९३८६
पुरुष मतदार – ५१७७२
महिला मतदार – ४७६१४

हेही वाचा : Gram Panchayat Election Result 2022 Live: भाजपाची जोरदार मुसंडी, ठरला १ नंबरचा पक्ष; नेत्याचं ट्वीट; पाहा निकालाचे प्रत्येक अपडेट

संगमनेर प्रशासनाकडून निवडणुकीसाठी जय्यत तयारी

तालुक्यात एकूण १५८ मतदान केंद्रे होती. या केंद्रांवर ७९० कर्मचारी, १५८ मतदान केंद्राध्यक्ष, ३१६ मतदान अधिकारी, १५८ मतदान अधिकारी (महिला), १५८ शिपाई, १५८ पोलीस कर्मचारी, ८० राखीव मतदान अधिकारी कर्मचारी अशी नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय ३७ ग्रामपंचायतींसाठी २६ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.