लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सध्या सुरु आहे. या अनुषंगानेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी राहुरीत सभा पार पडली होती. यावेळी सभेत बोलताना शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खोचक टीका करताना विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतरच्या पिढय़ांनी काय दिवे लावले?, असा निशाणा साधला होता.

या टीकेला आता राधाकृष्ण विखे यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी नगर जिल्ह्याचे कसे वाटोळे केले हे त्यांना पटवून देवू, जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची कधीही तयारी आहे. या चर्चेत त्यांनी जिल्ह्याचा विकास कसा होऊ दिला नाही, याबाबत आपण त्यांना पटवून देऊ, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा : महायुतीचा नाशिकच्या जागेवरील तिढा सुटला, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

“आम्ही काय विकास केला हे शरद पवार यांना माहिती नसेल. त्यांना आता विस्मरणाचा परिणाम झाला असेल. बाळासाहेब विखे पाटील यांना लोकांनी आठ वेळा निवडून दिले. मग काम केल्याशिवाय लोकांनी निवडून दिले का? मीदेखील सात वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर माझे त्यांना खुली चर्चा करण्याचे आव्हान आहे. नगर जिल्ह्याचे वाटोळे कसे केले. जिल्ह्याचे पाणी कसे गेले, जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प का येवू शकला नाही. औद्योगीकरण, शेती क्षेत्रासह कोणतेही क्षेत्र असो, या जिल्ह्यासाठी शरद पवार यांनी काय योगदान दिले त्यांनी जाहीर करावे. आज आप्पासाहेब पवार नाहीत. पण याचे उत्तर त्यांनी दिले असते”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली.

शरद पवार काय म्हणाले होते?

“लोकसभच्या निवडणुकीत मोदी गॅरंटीचा मोठा गवगवा करण्यात येत आहे. मात्र, ही गॅरंटी टिकणारी नाही. त्यांच्या गॅरंटीचा चेक वटत नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. तसेच ते पुढे म्हणाले होते, “विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला. मात्र, विठ्ठलराव विखे यांच्यानंतरच्या पिढय़ांनी काय दिवे लावले? कोणताच विकास केलेला नाही”, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली होती.

Story img Loader