सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. अशात महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे-पाटील यांना लॉटरी लागण्याची चर्चा सुरू आहे. त्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. ‘माझी छाती फाडून बघितली तरी त्यातही राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील’, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?

“जशी हनुमानाने छाती फाडून भगवान श्रीराम दाखवले, तशी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील. विखे-पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत, असं मला वाटतं. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. मात्र, माझ्या मित्राला ( विखेंना ) अडचण होईल, असं प्रश्न त्यांना विचारू नका. मी सुद्धा अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

“मुख्यमंत्री बदलणे किंवा त्याबद्दल दावा करण्याची चर्चा…”

यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. “अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र असून, भावनिक आहेत. भावनेच्या भरात ते बोलले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तमरित्या काम करत आहोत. मुख्यमंत्री बदलणे किंवा त्याबद्दल दावा करण्याची चर्चा व्यर्थ आहेत,” अशी स्पष्टोक्ती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

“हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही”

“अब्दुल सत्तारांच्या पोटातलं ओठावर आलं आहे. त्यांच्या पोटात शिजत असेल, ते सत्तारांनी बोलून दाखवलं. कुंकू एकाचं लावायचं, लग्न एकाबरोबर करायचं आणि राहायचं एकाबरोबर अशी परिस्थिती सत्तार यांची झाली आहे. हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही. त्यांच्या छातीत खूपजण निघतील,” असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लगावला आहे.

Story img Loader