शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण, शुक्रवारी ( ५ मे ) पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर शरद पवार आज ( ८ मे ) सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा ‘महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल, हे मी ठरवलं आहे,’ असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलता कसं येईल, याची काळजी घेणं मी ठरवलं आहे. तसेच, सोलापुरातील चित्र बदलण्यासाठी लक्ष घालावं लागेल. आम्हाला काम करावं लागेल. लोकांच्या सुख दुख:त सहभागी व्हावं लागेल आणि ते आम्ही करू. पण, ते केल्याशिवाय अपेक्षा करणे योग्य नाही.”

हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार अन्…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं विधान

“राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात जनतेला सत्ताबदल हवा आहे. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आता सर्व विरोधकांनीही एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यादृष्टीने विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत,” असेही शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “नाना पटोले राजकारणातील कमी बुद्धी असलेले प्रदेशाध्यक्ष, ज्याला…”, शहाजीबापू पाटलांची टीका

“थापांना जनता बळी पडणार नाही”

‘महाराष्ट्राचं चित्र कसं बदलता येईल, हे मी ठरवलं आहे,’ शरद पवारांच्या या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. “शरद पवारांनी चित्र बदलण्याचं स्वप्न दाखवलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. अशा थापांना जनता बळी पडणार नाही. कुटुंब-कुटुंबात भांडणं कुणी लावली? सहकार चळवळ कुणी संपुष्टात आणली? खासगीकरणाला कोण वाव देत आहे? लोकांना हे समजत नाही का?,” असे सवाल उपस्थित करत राधाकृष्ण विखे-पाटलांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrushna vikhe patil attacks sharad pawar over maharashtra change politics ssa
Show comments