घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवली असेल. पण, हा थोड्या दिवसांचा खेळ आहे. ३१ डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणार, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. याला मंत्री, भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरेंना सरकार गेल्याचं वैफल्य आहे. दुसरं आपला स्वत:चा पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्याचंही वैफल्य आहे. या वैफल्यामुळे आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.”

“भविष्यात अशा घटना घडू नये, याची दक्षता घेतली पाहिजे

इंदापुरात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली होती. यावर बोलताना विखे-पाटलांनी म्हटलं, “प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, असे प्रकार घडत गेले, तर सद्यस्थितीत गंभीर प्रश्न निर्माण होतील. काही लोकांच्या भावना होत्या. त्यामुळे ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. पण, आता हा प्रश्न संपला आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.”

“रोहित पवार केव्हापासून राज्याचे नेते झाले आहेत?”

‘नबाव मलिकांवर कारवाई करण्यात येते. पण, प्रफुल्ल पटेलांवर कुठलीही कारवाई होत नाही. पटेलांनी अजित पवारांना भाजपाबरोबर एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही का?’ असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर विखे-पाटील म्हणाले, “रोहित पवार केव्हापासून राज्याचे नेते झाले आहेत? की त्यांच्या प्रतिक्रियेवर आम्ही भाष्य करावे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrushna vikhe patil reply aaditya thackeray shinde govt collapse 31 december statement ssa
Show comments