नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी भाजपच्या उमेदवार रंजना भानसी यांचा पराभव केला. मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांची महापालिकेत युती आहे. मात्र, या पराभवामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही युती तुटण्याची शक्यता आहे. मनसेच्या मदतीला ऐनवेळी अपक्ष धावून आल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
स्थायी समितीच्या निवडणुकीत राहुल ढिकले यांना सहा तर रंजना भानसी यांना पाच मते मिळाली. नाशिक पालिकेत सत्ता स्थापन करताना झालेल्या चर्चेप्रमाणे यावेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपकडे देण्याचे ठरले होते. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणेच मी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. पण मनसेने ऐनवेळी दगाबाजी केल्यानेच आपला पराभव झाला, असे रंजना भानसी यांनी सांगितले. पालिकेत मनसेसोबतची युती पुढे चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader