Rahul Gandhi शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातले नेतेमंडळी त्यांना अभिवादन करत आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. तसंच महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसाठी दोन शब्द तरी राहुल गांधींकडून ( Rahul Gandhi ) वदवून दाखवा. त्यानंतर या पोस्टची चर्चा होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

काँग्रेसने आतापर्यंत कधीही बाळासाहेबांचे कौतुक केलेले नाही, असा दावा भाजपाकडून केला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील महाराष्ट्रातील प्रचारसभांत अनेक ठिकाणी याबाबत उल्लेख केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेला संबोधित करताना मोदी यांनी या टीकेचा पुनरुच्चार केला. “मुंबई हे आत्मसन्मानाचं शहर आहे. मात्र ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अपमानित केलं, त्यांच्याच हातात हे आत्मसन्मानाचं रिमोट कंट्रोल देण्यात आलंय. याच कारणामुळे काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करावी, असं मी आव्हान दिलं आहे. राहुल गांधींनी दोन शब्द तरी त्यांची स्तुती करावी असंही मोदी म्हणाले होते. ज्यानंतर राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) केलेली पोस्ट चर्चेत आहे.

हे पण वाचा- Priyanka Gandhi on BJP: मोदींचं आव्हान, प्रियंका गांधींनी बाळासाहेंबाचं नाव घेत दिलं प्रतिआव्हान

काँग्रेस आणि शिवसेना भिन्न विचारधारांचे पक्ष

काँग्रेस आणि शिवसेना हे दोन भिन्न विचारधारांचे पक्ष आहेत. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तर काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आलं होतं तेव्हापासून काँग्रेस आणि शिवसेनेची दिलजमाई झालेली दिसून आली. काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गेले त्यामुळे त्यांच्याच पक्षात बंड झालं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदार बाहेर पडले. यानंतर वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते की राहुल गांधी ( Rahul Gandhi )किंवा काँग्रेसकडून बाळासाहेब ठाकरेंबाबत दोन शब्द चांगले म्हटल्याचं दाखवून द्या किंवा त्यांना म्हणायला लावा. आता राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी हे आव्हान स्वीकारत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे.

काय आहे राहुल गांधींची पोस्ट?

“बाळासाहेब ठाकरे यांची १२ वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांची आठवण येते आहे. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच संपूर्ण शिवसेना कुटुंबासह आहेत.” या आशयाची पोस्ट राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केली आहे.

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी ही पोस्ट केल्यानंतर आता भाजपाकडून टीका केली जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे, किंवा यावर कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं ते पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi post about balasaheb thackeray on his death anniversary says remembering balasaheb scj