राहुल गांधी लाल रंगाचं संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात. देशात एकप्रकारे अराजकता परसवण्याचं काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते करत आहेत, अशा प्रकारची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना केली होती. त्यांच्या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या टीकेला आता राहुल गांधी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मते, बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे, ही नक्षलवादी कल्पना आहे. भाजपाची ही विचारसरणी म्हणजे संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांचा अपमान आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
पुढे बोलताना, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हा बाबासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीला समर्थन देतील आणि आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील, अशी प्रतिक्रियाही राहुल गांधी यांनी दिली.
हेही वाचा – Devendra Fadnavis : “शरद पवारांनी दिलेला मंत्र आता…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
राहुल गांधी यांच्या नागपूरमधील संविधान सभेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. “भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसेच “संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अर्बन नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. अर्बन नक्षलवादाचा हाच अर्थ आहे की लोकांची मने कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचं एक रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल. यामुळे देशाच्या एकतेला आणि एकात्मकतेला धोका निर्माण होईल”, अशी टीकाही त्यांनी केली होती.