Rahul Gandhi : जातनिहाय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे. आपल्या देशात ९० टक्के लोकांकडे काही अधिकार किंवा पैसे नाहीत तर मग त्यांचा अर्थ काय? मला वाटतं की सत्ता, पैसा नसेल तर आदर या गोष्टीला काय अर्थ आहे? जो माणूस भुकेलेला आहे, गरजवंत आहे त्याला आदर देऊन काय करणार? त्याऐवजी त्याला सक्षम बनवा. आदर तो कमवलेल असं राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे नागपूरमध्ये संविधान सोहळ्यात बोलत होते.

पाच टक्के लोक देश चालवत आहेत

पाच टक्के लोक देश चालवत आहेत. शेअर बाजार वधारला की या लोकांचा फायदा होतो. १६ लाख कोटी रुपये माफ केले गेले त्यावर कुणीही काहीही बोललं नाही. मी कर्नाटकात बोललो मला सगळे आरसा दाखवत आहेत. कुणीही ९० टक्क्यांबाबत बोललं की त्यांच्यावर टीका होते. शेतकऱ्याने कर्ज परत केलं नाही तर त्याला कर्जबुडव्या म्हणत तुरुंगात पाठवतात. अदाणी १ लाख कोटी बुडवतात त्यांना देशभक्त म्हटलं जातं. एकाला डिफॉल्टर बनवलं जातं दुसऱ्याला व्यावसायिक म्हटलं जातं. शेतकरी तुरुंगात जातो आणि दुसरा अदाणीसारखा माणूस प्रायव्हेट जेटने परदेशात जातो. याला विकास म्हटलं जातं. त्यामुळे जातनिहाय जनगणना हा आवाज जेव्हा वाढला तेव्हा मोदींची झोप उडाली. मी तुमचं ऐकून घेतो, माझं लक्ष्य हे आहे मला काहीही नको लोकांसाठी जे करायचं ते करायचं आहे. भारताच्या गरीबांचा आवाज ऐकणं हे माझं काम आहे. असंही राहुल गांधी म्हणाले. संघ आणि भाजपाचे लोक हे विकास, प्रगती असे शब्द आणून संविधान मारण्याचं काम करत आहेत. असं राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
सततच्या बाहेर राहण्यामुळे मुलेही मावशी म्हणू लागली, सुप्रिया सुळे यांची कोटी
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे पण वाचा- भाजपला गोरगरिबांचा विसर-राहुल गांधी

भाजपाने संविधान मारण्याचं काम सुरु केलं आहे

राजे महाराजांकडे निवडणूक आयोग नसायचा. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या फक्त व्यक्ती नव्हत्या तर ते विचार होते. असंही राहुल गांधी त्यांच्या भाषणात म्हणाले. आरएसएस संविधानावर सरळ आक्रमण करु शकत नाही. कारण त्यांनी तसं करायचं ठरवलं ते ते पाच मिनिटांत हरतील. त्यामुळे त्यांनी विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा गोंडस शब्दांच्या मागे लपून संघ आणि भाजपाने संविधान मारण्याचं काम सुरु केलं आहे. शब्द चांगले वापरतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. असंही राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले.

जातीय जनगणना झाल्यास देशात सगळं चित्र स्पष्ट होईल

जातीय जनगणना केल्याने भारतात सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. देशात कुणीही असो प्रत्येकाला समजेल आपल्या हाती किती पैसा आहे? किती हक्क आहे? मला खात्री आहे की जेव्हा हे होईल त्यात दलित, आदिवासी, मागास असे कुणीही देशाच्या पुंजीमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. जातनिहाय जनगणना हा विकास करण्याचा एक भाग आहे. जगातला एक अर्थतज्ज्ञ आहे त्याच्याशी माझी चर्चा झाली तो मला म्हणाला, भारत हा जगातल्या असमान देशांपैकी एक आहे. मी त्याला म्हटलं की तुम्ही मला जे सांगितलंं त्यात जात हा शब्द वापरलेला नाही. ज्यातून असमानता मुद्दा सुरु होते तो जात हा मुद्दा नाहीच.

दलित, मागास, आदिवासी यांना जात शोधावी लागत नाही

आपल्या देशात दलित, मागास, आदिवासी यांना जात शोधावी लागत नाही ती त्यांना रोज कळते. जातनिहाय जनगणनेमुळे स्पष्टता येईल. त्यामुळेच भाजपाचे लोक, आरएसएसचे लोक हे जातनिहाय जनगणनेला विरोध करत आहे. तुम्ही कितीही चर्चा करा मात्र जातनिहाय जनगणना होणार म्हणजे होणारच. असंही राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले.

Story img Loader