उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी निवडणूक निर्णय कार्यालयात गर्दी केली होती. वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांनी आज अर्ज भरला. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या जावेद रशीद शेख यांना महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेरगाव येथील निवडणूक निर्णय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरावा लागतो.
हेही वाचा…श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
u
याच दरम्यान आज दुपारी जावेद शेख हे वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. तेव्हा, राहुल कलाटे यांनी जावेद शेख यांना तू कशाला फॉर्म भरतो आहेस?, तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरी मधून फेकून दिल्याची तक्रार काळेवाडी पोलीस ठाण्यात शेख यांनी दिली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी फॉर्म भरण्याच्या दिवशीच राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या बाजूला थांबला म्हणून त्याला दुसरीकडे जाऊन थांबण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी सीसीटीव्ही तापासाव. मी त्यांना धमकी दिली नाही.” राहुल कलाटे- महाविकास आघाडी उमेदवार