खिचडी घोटाळा आणि आमचा काहीही संबंध नाही. तो आहे असं जर संजय राऊत यांनी सिद्ध केलं तर आम्ही राजकारण सोडून देऊ असं शिंदे गटाचे राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांच्या लोकांची नावं या घोटाळ्यात आले आहेत. जो पक्ष सोडतो तो चोर, खोके सरकार वगैरे टीका करतात. तोपर्यंत हे शहाणे, आमच्यावर प्रेम करणारे. पक्ष सोडेपर्यंत मांडीवर का घेऊन बसता? असा प्रश्न अमेय घोले यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. आज राहुल कनाल आणि अमेय घोले या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

राहुल कनाल काय म्हणाले?

“मी आज बाळासाहेब ठाकरे भवनात आहे. मी आज बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो. आमच्यापैकी कुणाचंही नाव तुम्हाला कुठल्याही घोटाळ्यात आढळून आलं तर, कुठलीही कंपनी असो किंवा तुम्ही केलेला खिचडी घोटाळा, डेड बॉडी बॅगचा घोटाळा, रेमडिसिव्हिरचा घोटाळा तुमच्या कुठल्या घोटाळ्यात आमचं नाव आलं तर आम्ही राजकारण सोडू. मात्र आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्हीही बाळासाहेबांची शपथ घ्या आणि तुमचं म्हणणं खोटं असेल तर राजीनामा द्या.” असं आव्हानच राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

राहुल कनाल म्हणाले, “संजय राऊत खोटं बोलून पळून जातात. माझं तुम्हाला आव्हान आहे तुम्हाला किती वेळ हवा आहे? एक आठवडा, दहा दिवस? किती वेळ हवाय तो घ्या. माध्यमांसमोर या आणि पुरावे द्या. आम्ही राजकारणातून निवृत्त होऊ. जर ते पुरावे आढळले नाही तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही आमच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप करत आहात. पण तुम्ही (संजय राऊत) खिचडी खायला कुठे जातात आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ. आम्ही कोव्हिड काळात चांगलं काम केलं आहे. तुमच्या नेत्यांच्या हस्तेच मला पुरस्कार दिल्याचे फोटो आहेत.

हे पण वाचा- “शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागण हे कर्माचं फळ, फडणवीस असे अर्धवट…”, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका

वांद्रे पश्चिम भागात माझा फोटो का लावला? आमच्या व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये का आलात? २०२३ मध्ये माझं लग्न झालं तेव्हा तुम्ही माझ्या लग्नातही आला होतात तेव्हा मी घोटाळे करणारा नव्हतो का? मी काही व्हिडीओही आणले आहेत. आमच्याकडे आम्ही काय काम केलं आहे त्याचा अहवाल आहे. आम्ही एक लाख रेशनची पाकिटं वाटली. तुमच्यासारखे सरकारकडून पैसे घेऊन लोकांना मदत केली नाही. वरळीत पहिली रुग्णवाहिका मी दिली होती. कोळीवाड्यात आम्ही रेशन आणि औषधं घेऊन गेलो होतो. तुम्ही कोव्हिड काळात काय काम केलं? ते दाखवा. सकाळी यायचं आणि निघून जायचं. ओपन डिबेटमध्ये या समोरासमोर बोलू.” असं आव्हान राहुल कनाल यांनी दिलं आहे.

अमेय घोले म्हणाले की सामनामध्ये आमच्या कौतुकाची बातमी छापली होती. तुमच्या सुजीत पाटकर आणि सुनील कदम यांच्या बँक खात्यात पैसे कसे आले ते जरा तपासा. आम्ही खोटं बोलत असू तर आमच्या बातम्या का छापल्या? २०२० ते २०२२ या काळातले महापौर बंगल्यातले सीसीटीव्ही फुटेज तपासा, किती लोकांना संजय राऊत फोन करायचे याचे रेकॉर्ड तपासा असंही अमेय घोले यांनी म्हटलं आहे.

Story img Loader