भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी सरकारने आमदार राहुल कूल यांना क्लिन चिट दिली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कूल यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी कूल यांना आज (२८ जुलै) क्लिन चिट मिळाली आहे. यावर आता आमदार राहुल कूल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल कूल म्हणाले, हे सगळे राजकीय आरोप होते, यात काहीच तथ्य नव्हतं. हे मी याआधीपण सांगितलं होतं आणि आजही तेच सांगेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार राहुल कूल म्हणाले, या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांना (संजय राऊत) सत्य काय आहे ते माहिती नाही. मी आरोप झाल्यावर तीनच दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्या शंकांचं निरसन केलं होतं. अशा चौकशा याआधी झाल्या आहेत. त्यामध्ये तथ्य नाही. या चौकशीतून काही बाहेर आलं नाही, यापुढेही काही बाहेर येणार नाही. उलट आरोप झाल्यावर माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निषेधाचा मोर्चा काढला.

राहुल कूल म्हणाले, संजय राऊतांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले, त्यातला एकही आरोप खरा ठरला नाही. ते एकेकाळी असं म्हणाले होते, गुवाहाटीवरून ४० मृतदेह येतील, तसं काही झालं का? त्यामुळे त्यांना फारसं गांभीर्याने घेऊ नका. लोकांनी मला दोन वेळा निवडून दिलं आहे, ही लोकांची क्लिन चिट आहे.

हे ही वाचा >> “…तर शेकडो प्राण वाचले असते”, मनसेचं ट्वीट चर्चेत; म्हणाले, “इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’

दरम्यान, राहुल कूल यांना क्लिन चिट दिल्यानंतर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रियादेखील आली आहे. संजय राऊत म्हणाले, हे सरकार म्हणजे क्लिनचीट देणारा कारखाना आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात शेतकरी सभासद आहेत. शेतकऱ्यांचे ५०० कोटी चोरले आहेत. लेखापरिक्षकांना क्लिन चिट देताय, उद्या आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही कारवाई करू”