आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल, मे महिन्यात निकाल देताना रिझनेबल वेळेत निकाल लावला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली. त्यानंतर १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिली. माझी अशी अपेक्षा अपेक्षा आहे की १० जानेवारी रात्री ११.५९.५९ सेकंदांपर्यंत राहुल नार्वेकर वेळ खेचतील आणि आणखी वेळकाढूपणा करतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आमदार अपात्रता प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. लवाद ज्यावेळी नेमून दिला जातो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? असा प्रश्न उपस्थित होतो. यांची मिलिभगत आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राहुल नार्वेकर यांनी दोनदा आरोपीची भेट का घेतली?

आता लवाद म्हणून विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष असे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत असं झालं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आरोपीला दोनदा अध्यक्ष का भेटले? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची? असा आमचा जनतेच्या न्यायालयात प्रश्न आहे. आज उल्हास बापट यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी म्हटलं आहे की दोन महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्यात दोन वर्षे काढली आहेत. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणं सुरु आहे त्यामुळे लोकशाहीचा खून होतो आहे का? अशी आता शंका निर्माण झाली आहे.

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

आरोपीला न्यायमूर्ती उघडपणे कसे भेटतात?

आरोपीला न्यायमूर्ती उघडपणे भेटत आहेत. अशा गोष्टी घडत असताना त्यांच्याकडून काय निकालाची अपेक्षा ठेवणार? जनतेला कल्पना आलीच असेल. आम्ही जनतेच्या न्यायालयात काम करणारे लोक आहोत. हे सगळं लोकांच्या डोळ्यांदेखत घडतं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आता अपेक्षा आहे. न्यायमूर्ती म्हटल्यावर रामशास्त्री प्रभुणेंचं नाव आपल्यासमोर येतं. त्यावेळी त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निवाडा केली होती. आमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. तसंच जनतेच्या न्यायालयातही आम्ही हा विषय मांडायचा म्हणून मी हे तुम्हाला सांगतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश होते त्यात वेळकाढूपणा करण्यात आला आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

सध्याचं सरकार हे बेकायदेशीर सरकार आहे. जे दोन वर्षे महाराष्ट्रावर राज्य करतं आहे. जी गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे. ज्या गोष्टीचा निकाल उघडपणे लागायला हवा होता त्यासाठी दोन वर्षे काढली गेली आहेत. तसंच उद्याही वेळकाढूपणा केला जाईल पुढची तारीख मिळेपर्यंत निवडणुका होऊन जातील असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader