एकनाथ शिंदे यांनी एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंड केलं होतं. या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी १६ आमदारांना अपात्र केलं होतं. त्याविरोधात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी यावर निकाल दिला नाही. पण, अपात्रतेबाबत कधीपर्यंत निर्णय देणार? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सांगितलं की, निर्धारित वेळत याचा निर्णय द्यावा. लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत आम्ही निर्णय देऊ,” असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “मागच्या वर्षी ५१ आमदारांनी शरद पवारांना भाजपाबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण…”, प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

जून महिन्यात राजकीय पक्ष कोणाकडे होता? हे पाहण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यावर आतापर्यंत कोणता निर्णय घेतला गेला? असे विचारल्यावर राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “राजकीय पक्ष कोणता आहे, हे पहिल्यांदा आम्हाला पहावे लागेल. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नेतृत्व कोण करते आहे? पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नेतृत्व योग्य आहे का? हे पाहूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निर्णय घेताना घाईही करणार नाही. आणि विलंबही लावणार नाही.”

हेही वाचा : प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला? उज्ज्वल निकम म्हणाले…

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना लवकरात-लवकर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narvekar on 16 mla disqualification eknath shinde group ssa