Rahul Narwekar : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. यानंतर आता आमदारांचे शपथविधी पार पडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा सोहळा ५ डिसेंबरला पार पडला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ७ डिसेंबर, ८ डिसेंबर असे दोन दिवस आमदारांचे शपथविधी सुरु आहेत. दरम्यान राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष म्हणून अर्ज भरतील अशी चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी होणार विधानसभेच्या अध्यक्षांची निवड

राज्यातील २८८ आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार का? ही चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळेच राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होतील अशी चिन्हं आहेत.

राहुल नार्वेकर दुपारी १२ च्या सुमारास अर्ज दाखल करणार?

राहुल नार्वेकर हे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय घेणार

राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन. पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल. मला पक्षाने अनेक संधी दिल्या आहेत आणि यापुढेही जी संधी दिली जाईल त्यानुसार काम करेन. रविवारी विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार कोणाला अर्ज भरायला सांगितलं जाईल त्याला अर्ज भरावं लागेल.

शपथविधीच्या पहिल्या दिवशी गोंधळ

शपथविधीच्या पहिल्याची दिवशी विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. मविआच्या आमदारांनी आज आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत सभात्याग गेला. त्यामुळे आज केवळ सत्ताधारी आमदारांचा शपथविधी पार पडला. आतापर्यंत जवळपास १५५ हून आमदारांचा शपथविधी संपन्न झाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आता महाविकास आघाडीचे आमदारही शपथ घेणार आहेत. मविआच्या आमदारांचा शपथविधी रविवारी पार पडणार आहे असंही कळतं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narwekar may be the next speaker of maharashtra legislative assembly scj