Rahul Narwekar On Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये झाला. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, यामध्ये काही नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. यातच सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी आज उद्धव ठाकरे हे देखील नागपूरच्या विधीमंडळात दाखल झाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची भेट का घेतली? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? तसेच विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरे गटाकडून काही प्रस्ताव देण्यात आला आहे का? याची माहिती त्यांनी सांगितली.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”

हेही वाचा : “होय, मी उद्धव ठाकरेंशी बोलतो”, भुजबळांची कबुली; शरद पवार व सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत म्हणाले…

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळाचे गटनेते आहेत. त्या अनुषंगाने ते भेटीसाठी आले होते. ही सदिच्छा भेट होती. आता आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचा पाहुणचार नेहमी करतो. त्यामुळे त्यात वेगळं असं काही नाही”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते पदासाठी काही चर्चा केली का? किंवा त्यांनी काही प्रस्ताव दिला आहे का? असं विचारलं असता राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “माझ्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाबाबत जर कोणता प्रस्ताव आला त्यावर नक्कीच विचार करेन”, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

भेटीबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत करताना या भेटीबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा या सरकारकडून आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली वैगरे हे प्रश्न आहेतच. त्याबाबत जनतेत जाऊन आम्ही आवाज उचलत राहू.”

Story img Loader