बनावट वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करून छापेसत्र राबवावे, असा आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला.
बनावट वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गठीत जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी हा आदेश दिला. समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन डोईफोडे, डॉ. राम देशपांडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रूपेश व्हाटकर, डॉ. हरी भुमे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, की जिल्हय़ात कार्यरत बनावट वैद्यकीय व्यावसायिकांचा आढावा घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित न्यायालयात खटले दाखल करण्याची कारवाई पोलीस विभागामार्फत होणे आवश्यक आहे. समितीचे सदस्य जिल्हा शल्यचिकित्सक यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणे गरजेचे आहे. समितीच्या स्थापनेपासून जूनपर्यंत जिल्हय़ात २७ पोलीस ठाण्यांतर्गत ४६ बनावट वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पकी दोन प्रकरणांत आरोपींना शिक्षा झाली. सहा आरोपी न्यायालयातून सुटले, तर ३८ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा