नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला वेग आला आहे.  पीडब्लूडीचे माजी सचिव देवदत्त मराठे यांच्या घराची झाडाझडती करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. मराठे यांचे युनियन बॅंकेतील एक लॉकर लाचलुचपत विभागाने सील केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच एसीबीने माजी खासदार आणि तत्कालीन सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यांच्या सोबतच एकूण १७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Story img Loader