अलिबाग – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून रायगड किल्ल्याकडे सहलीला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसला खोपोली जवळ अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण किरकोळ जखमी आहेत.
मुंबई पुणे महामार्गावर खोपोली एक्झिट जवळ ही दुर्घटना सकाळी सातच्या सुमारास घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली खडकाळ भागात जाऊन आदळली. या दुर्घटनेत गाडीच्या क्लिनरचा मृत्यू झाला. चालक व इतर चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध
हेही वाचा – प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक बचाव पथके आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील ४९ विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना गगनगिरी महाराज मठात नेऊन प्राथमिक उपचार केले. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली.