अलिबाग : दिवाळीच्या सुट्टीत अनेकांनी पर्यटनावर भर दिला आहे. मुंबईच्या जवळच असल्याने पर्यटकांनी रायगड जिल्ह्यतील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दर्शवली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी रायगड जिल्ह्यतील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी-पोफळीच्या बाग यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे. गेली तीन वर्षे करोनामुळे हे किनारे ओस पडले होते. आता दिवाळीत मात्र पर्यटकांची पावले पुन्हा रायगडकडे वळली आहेत. मुंबई- पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांनी इथे गर्दी केली आहे. दोन-चार दिवस निवांत स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी लोक घराबाहेर पडले आहेत. निमित्त दिवाळीचे असले तरी पर्यटक रायगडच्या किनाऱ्यांवर मोकळा श्वास घेताना दिसत आहेत. वेगवेगळे वॉटरस्पोर्ट्स, उंटसवारी , घोडागाडी यामुळे बच्चे कंपनीच्या आनंदाला पारावर उरलेला नाही .
रायगडचे किनारे पर्यटकांनी बहरले; दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनावर भर; मुंबई- पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांची गर्दी
दिवाळीच्या सुट्टीत अनेकांनी पर्यटनावर भर दिला आहे. मुंबईच्या जवळच असल्याने पर्यटकांनी रायगड जिल्ह्यतील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दर्शवली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी रायगड जिल्ह्यतील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-10-2022 at 01:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad beaches tourism diwali holidays crowd tourists state including mumbai pune ysh