अलिबाग : नाताळाची चाहूल लागताच, रायगड जिल्ह्यात हजारो पर्यटक दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटकांची रेलचेल वाढल्याने पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस आले आहेत. अलिबाग, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन परिसर पर्यटकांनी बहरले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
थंडीची चाहूल लागली की कोकण किनारपट्टीवरील पर्यटन हंगाम पुन्हा जोमाने सुरू होतो. दिवाळी पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एप्रिलपासून जून महिन्यापर्यंत पर्यटकांची मोठी रेलचेल या ठिकाणी पहायला मिळते. सध्या याची प्रचिती रायगड मधील अलिबाग, श्रीवर्धन आणि मुरुड मधील पर्यटन स्थळांवर पहायला मिळत आहे. इथं आलेले पर्यटक किनारयांवर फिरून झाल्यावर पाण्यात मनसोक्त डुंबत आहेत. एटीव्ही राईड बरोबरच वेगवेगळया वॉटरस्पोर्टसचा मनमुराद आनंद घेत आहेत. त्यात बनाना राईटस, जेट स्की, पॅरासेलींग यांचा समावेश आहे.
हेही वाचा : सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
उंट सवारी घोडागाडी यामुळे बच्चे कंपनी खुश आहे. अगदी लहान मुले वाळूत वेगवेगळया प्रतिकृती बनवण्यात रमलेले पहायला मिळतात. इथला निसर्ग आणि स्वच्छ सुंदर समुद्र किनारा पर्यटकांना भावतो आहे. दोन दिवसांसाठी आलो असताना इथून पाय निघत नाही, असं पर्यटक सांगतात. नाताळच्या सुट्ट्यामुळे अलिबाग मधील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी. नागाव, चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे २० हजार पर्यटक दाखल झाले होते. तर मुरुड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरुड आणि फणसाड येथे १२ हजारहून अधिक पर्यटक दाखल झाले होते. पर्यटकांच्या आगमानामुळे समुद्र किनारे फुलून गेले होते. स्थानिक व्यावसायिकांना यामुळे रोजगार संधी उपलब्ध झाल्या होत्या. बोटींग व्यवसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत असल्याचे पहायला मिळत होते. नाताळची सुटी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना इथल्या व्यावसायिकांनाही त्याचे वेध लागले आहेत. त्यांनीही पर्यटकांचया स्वागताची तयारी सुरू केली आहे.
आम्ही दोन दिवसांसाठी आलो होतो. परंतु इथलं निसर्ग सौंदर्य पाहून इथून पाय निघत नाही. इथले कोकणी जेवणही अप्रतिम चवीचे आहे. आमची मुलंदेखील खुश आहेत. हे सगळं बघता आम्ही आमचा मुक्काम वाढवला आहे.
सोनल थोरात, पर्यटक