अलिबाग : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, कोकण विभागाचे अप्पर आयुक्त किशन जावळे हे रायगडचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. प्रशासन आणि राज्यकर्त्यांमधील सुप्त संघर्षामुळे म्हसे यांच्या बदली मागचे मुळ कारण असल्याचे बोलले जात आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी योगशे म्हसे यांची कार्यकाळ पुर्ण होण्या आधीच बदली करण्यात आली. राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे. कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून योगेश म्हसे यांनी नावलौकीक मिळवला होता. वर्षभराच्या काळात त्यांनी लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचा प्रयत्न केला. जनसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच शासनाच्या सुशासन निर्देशांक उपक्रमात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इरशाळवाडी येथील दरड दुर्घटनेत मदत व बचाव कार्य जलदगतीने व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपदग्रस्तांचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच कार्यकाळात माणगाव येथे शासन आपल्या दारी, किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा, खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळा, पंतप्रधान मोदी यांच्या उलवे येथील भव्यकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा अपवाद सोडला. तर सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या त्यांना पार पाडले. मात्र त्यांची प्रशासकीय कामकाजातील कर्तव्य कठोरता जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांसाठी अडचणीची ठरत होती. नियमानुसार काम असा अट्टाहास त्यांचा होता. त्यामुळे प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यात सुप्त संघर्ष निर्माण होत होता. यातूनच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

राजकीय नाराजीतून झालेल्या बदल्यांचा इतिहास…..

रायगड जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण होण्याआधी जिल्हाधिकारी यांची बदली होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही राजकीय दबावातून अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. सिमा व्यास यांची रायगडच्या जिल्हाधिकारी पदावरून केवळ सहा महिन्यांत बदली करण्यात आली होती. सुमंत भांगे यांची १४ महिन्यांत बदली करण्यात आली होती. रायगडला स्वच्छतेची शिस्त लावणाऱ्या, महामुंबई सेझ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरणाऱ्या निपूण विनायक यांची १६ महिन्यांत बदली करण्यात आली. निसर्ग आणि तौक्ते वादळात चांगले काम करणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची १८ महिन्यांतच बदली करण्यात आली होती. तर योगेश म्हसे यांची १३ महिन्यांत बदली करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district collector yogesh mhase transferred css
Show comments