राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्ह्य़ाच्या पुरुष व महिला संघांचा मॅटवर कसून सराव सुरू आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा सांगली येथे २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत आपल्या संघातील खेळाडूंची चांगली कामगिरी व्हावी यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने दोन्ही संघांचा सराव मॅटवर घेण्याचा निर्णय घेतला. ना. ना. पाटील हायस्कूल, पेझारी येथे दोन्ही संघ सराव करीत आहेत. २० नोव्हेंबर रोजी रायगडचे संघ सांगलीला रवाना होतील. पुरुष संघाचे प्रशिक्षक संजय मोकल, व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे हे संघाचा कसून सराव करून घेत आहेत. दिलीप धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघ सराव करीत आहे. दोन्ही संघांत गुणवान खेळाडू असल्यामुळे राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रायगडचे संघ चांगली कामगिरी करतील, असा विश्वास रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हा कबड्डी संघांचा प्रथमच मॅटवर कसून सराव
राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्ह्य़ाच्या पुरुष व महिला संघांचा मॅटवर कसून सराव सुरू आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा सांगली येथे २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार आहे.
First published on: 20-11-2012 at 05:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district kabbadi team practicsed first time on mat