राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्ह्य़ाच्या पुरुष व महिला संघांचा मॅटवर कसून सराव सुरू आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा सांगली येथे २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत आपल्या संघातील खेळाडूंची चांगली कामगिरी व्हावी यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने दोन्ही संघांचा सराव मॅटवर घेण्याचा निर्णय घेतला. ना. ना. पाटील हायस्कूल, पेझारी येथे दोन्ही संघ सराव करीत आहेत. २० नोव्हेंबर रोजी रायगडचे संघ सांगलीला रवाना होतील. पुरुष संघाचे प्रशिक्षक संजय मोकल, व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे हे संघाचा कसून सराव करून घेत आहेत. दिलीप धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघ सराव करीत आहे. दोन्ही संघांत गुणवान खेळाडू असल्यामुळे राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रायगडचे संघ चांगली कामगिरी करतील, असा विश्वास रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा