रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे पुरुष खुल्या गटाची रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीपासूून पेण नगर परिषद मैदान, पेण येथे ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेतून यंदाच्या हंगामासाठी रायगड जिल्ह्य़ाचा पुरुष क्रिकेट संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामध्ये सहभागी होईल. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रुपये २५ हजार व चषक, उपविजेत्या संघास रोख रुपये १५ व चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये ५००० व चषक, चतुर्थ क्रमांकासाठी रोख रुपये ५०० व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या रायगड जिल्ह्य़ातील संघांनाच या स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. क्लबसाठी रुपये ३००० व कंपनीच्या संघांसाठी रुपये ५००० प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. निवडचाचणी संदर्भात अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चिटणीस संजय तावडे ९९६०६७०७७०, कार्योपाध्यक्ष जयंत नाईक ९४२२६९२९४५, प्रकाश पावसकर ९४२३३७७६४६, सहसचिव अनिल गद्रे ९४२२६९५१९९ यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्य़ातील जास्तीतजास्त संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी केले आहे.
पेण येथे रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे पुरुष खुल्या गटाची रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीपासूून पेण नगर परिषद मैदान, पेण येथे ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
First published on: 18-02-2013 at 04:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district selection test cricket compitition at pen