रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्तापितांना धक्के बसले आहेत. शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांची घरच्या मैदानावर कोंडी झाली. तर अलिबागमध्ये शेकापच्या जयंत पाटलांना धक्का बसला. खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांना महाविकास आघाडीने चितपट केले.

हेही वाचा- गडचिरोली: महविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

Mustafabad Assembly Election Result 2025
Mustafabad Vidhan Sabha Election Result 2025 Live: मुस्तफाबाद विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Seema-puri Vidhan Sabha Election Result 2025 Live: सीमापुरी विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Patparganj Assembly Election Result 2025
Patparganj Vidhan Sabha Election Result 2025 Live: पटपडगंज विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Ambedkar-nagar Vidhan Sabha Election Result 2025 Live: आंबेडकर नगर विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Vikaspuri Assembly Election Result 2025
Vikaspuri Vidhan Sabha Election Result 2025 Live: विकासपुरी विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Janakpuri Assembly Election Result 2025
Janakpuri Vidhan Sabha Election Result 2025 Live: जनकपुरी विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Rajouri-garden Assembly Election Result 2025
Rajouri-garden Vidhan Sabha Election Result 2025 Live: राजौरी गार्डन विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीच्या ११६ जागांसाठी निवडणूक पार पडली. सरपंचपदासाठी ३६ तर सदस्यपदासाठी २१६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जात होते. सोमवारी सकाळी या सर्व ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी प्रस्तापितांना मतदारांनी धक्के दिल्याचे पहायला मिळाले.

१६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपाने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १, शेकापने १ तर स्थानिक आघाड्यांनी ३ ग्रामपंचायती जिंकल्या. अलिबाग तालुक्यातील नवगाव आणि वेश्वी ग्रामपंचायतीत शेकापला शिवसेना शिंदे गट प्रणीत महाघाडीने धक्का दिला. दोन्ही ग्रामपंचायतीत शेकापचे सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. विशेष म्हणजे आमदार जयंत पाटील यांचे वास्तव्य असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षांतर्गत बंडखोरी शेकापला भोवली. दोन्ही ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले असले तरी शेकापचे जास्त निवडून आले.

हेही वाचा- Andheri by election : “हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपाने मंजूर केले; महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवायची होती तर …”

महाड तालुक्यात शिंदे गटाचे पक्ष प्रतोद असलेल्या आमदार भरत गोगावले यांना महाविकास आघाडीने धक्का दिला. काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचे सरपंच चैतन्य म्हामूणकर निवडून आले. दहा सदस्य निवडून येऊनही गोगावले यांची या पराभवामुळे चांगलीच कोंडी झाली. पोलादपूर मधील तीन ग्रामपंचायती मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकल्या. तर चौथी ग्रामपंचात मनसे प्रणीत आघाडीने ताब्यात घेतली राखली.

माणगाव मधील तीन ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाने, १ ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाने तर एक शेकापने राखली. खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी झाली. आमदार महेंद्र थोरवे यांना आघाडीने चितपट केले. चौक, आसरे आणि लोधीवली या तीन ग्रामपंचायती शिवसेना ठाकरे गट प्रणित महाविकास आघाडीने राखल्या. तर तुपगाव ग्रामपंचात भाजपने जिंकली. याशिवाय पनवेल मधील खैरणे ही ग्रामपंचायत भाजपने शेकापकडून खेचून घेतली. एकूणच मतदारांनी या निवडणूकीत प्रस्तापितांना धक्के दिल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा- Gram Panchayat Election Results 2022 Live : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत


महाविकास आघाडी- काळीज खरवली, चौक, आसरे, लोधीवली, पोटल

शिवसेना शिंदे गट- तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रक, वझरवाडी, पन्हळघर बुदृक

शिवसेना ठाकरे गट – पन्हळघर खुर्द

भाजप – तुपगाव, खैरणे.

शेकाप- देगाव

शिवसेना शिंदेगट प्रणित स्थानिक आघाडी – नवेदर नवगाव, वेश्वी

मनसे प्रणित स्थानिक आघाडी तुर्भे खुर्द

Story img Loader