अलिबाग- माथेरानमध्ये हात रिक्षा ओढणाऱ्या चालकांच्या हातात ई रिक्षाचे स्टेअरींग आले आहे. पहिल्या टप्प्यात २० ई रिक्षा हात चालकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे हात रिक्षांच्या कष्टप्रद जाचातून रिक्षा चालकांची सुटका होणार आहे.

माथेरानमधील हात रिक्षाची अमानवी प्रथा बंद व्हावी, आणि त्याऐवजी ई रिक्षा सरू व्हावी यासाठी माथेरान हात रिक्षा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने आजच्या युगात मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा कशा सुरू राहू शकतात असे म्हणत राज्यसरकारला फटकारले होते. यानंतर सुरुवातीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर माथेरानमध्ये ई रिक्षा चालविण्यास मंजुरी दिली होती. आता पुढील आदेश होत नाही तोवर ई रिक्षा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरूच ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये ई रिक्षा पुन्हा एकदा धावू लागली आहे. पण ई रिक्षा चालविण्यासाठी माथेरान नगर परिषदेने सुरवातीला ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यामुळे हात रिक्षा चालकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली होती. माथेरानच्या ई रिक्षा चालविण्यासाठी हात मिळावी यासाठी हात रिक्षा संघटना आग्रही होत्या. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले होते. रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक परमिट आणि परवानेही त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतले होते. मात्र हात रिक्षा चालकांना डावलून माथेरान नगर परिषदेनी पुन्हा एकदा ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्यामुळे हात रिक्षाचालकांना पुन्हा एकदा हातरिक्षाच ओढण्याची वेळ आली होती. त्यामुळे हात रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली होती.

vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
Violation of traffic rules Mumbai, rickshaw drivers Mumbai,
मुंबई : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा
MMRDA, Kanjurmarg metro 6 carshed
कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या कामाला न्यायालयाची स्थगिती
Western Expressway, Repair of bridges Western Expressway, Western Expressway latest news,
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Orange Gate, Marine Drive, twin tunnel, Atal Setu, MMRDA
दुहेरी बोगद्याचा टोल ‘अटल सेतू’वरच, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्यासाठी आकारणी, पूर्वमुक्त मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना मात्र सूट

हेही वाचा – लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ

हेही वाचा – शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “मी गेल्या एक वर्षापासून…”

१५ एप्रिलला झालेल्या सुनावणीत सर्वोच्य न्यायालयाने २० ई रिक्षा सुरू करण्यास परवानगी दिली होती. यानंतर निर्देशानंतर आता माथेरानचा ई रिक्षा प्रकल्प श्रमिक रिक्षा संघटनेच्या ताब्यात देण्यात आला आहे. हात रिक्षाचालकांनी पहिल्या टप्प्यात २० रिक्षा खरेदी केल्या असून, त्या सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या २० ई रिक्षांच्या सेवेचा शुभारंभ केला, अशी माहिती ई रिक्षासाठी न्यायालयात याचिका करणाऱ्या सुनील शिंदे यांनी दिली.