ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये जवळपास ३० ते ४० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. या घरांमध्ये जवळपास १०० नागरिक मलब्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची बचावपथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे आदी मंत्रीही त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

नेमकी घटना काय घडली?

बुधवारी रात्री ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. ईर्शाळवाडीच्या पायथ्यापासून काही उंचीवर ठाकूरवाडी आहे. मात्र, पायथ्यापासून ठाकूरवाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे पायवाटेनेच वाडीवर पोहोचता येत आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकासमोर बचावकार्य पार पाडण्याचं मोठं आव्हान आहे. पक्का रस्ता नसल्यामुळे जेसीबी वगैरे मोठी यंत्रं ठाकूरवाडीत नेता येत नसल्यामुळे सध्या एनडीआरएफकडून कुदळ, फावड्यासारख्या हत्यारांच्या मदतीनेच ढिगारा उपसण्याचं काम चालू आहे.

Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Murder of son who became obstacle in immoral relationship women and her boyfriend arrested
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून, आईसह प्रियकर अटकेत
in survey found 522 out of school children conducted by Municipal Corporation and NGOs
पिंपरी : उद्योगनगरीतील ५२२ मुलांनी चढली नाही शाळेची पायरी; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती
Dispute between two groups in Hariharpeth area of June shahar akola
अकोल्यात दोन गटात वाद; दगडफेक, वाहनांची जाळपोळ
motor-tempo accident natepute, accident natepute
सोलापूर : नातेपुतेजवळ मोटार-टेम्पो अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू, तिघे जखमी
A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
A teacher of a school in Pune brutally beat up a student of class 6 Pune news
शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

दरम्यान, रात्री नेमकं काय घडलं? यासंदर्भात एका प्रत्यक्षदर्शीनं टीव्ही ९ शी बोलताना माहिती दिली आहे. या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, काही शाळकरी मुलांमुळे गावातल्या लोकांना दरड कोसळल्याची माहिती मिळाली आणि तेव्हा अनेक गावकरी घरातून बाहेर आल्याचं सांगितलं. “हे रात्री ११ वाजता अचानक घडलं. शाळेतली काही मुलं मोबाईलवर व्हिडीओ बघत होती. त्यांना वरून येणाऱ्या दगडांचा आवाज आला. त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा गावातल्या लोकांना माहिती झालं”, अशी माहिती या प्रत्यक्षदर्शीनं दिली.

रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेक जण बेपत्ता, चार जणांचा मृत्यू, NDRF ची बचावपथकं घटनास्थळी

“जेव्हा या मुलांनी आरडाओरडा केला, तेव्हा जेवढे वाचायचे तेवढे वाचले. बाकी सगळे ढिगाऱ्याखाली गेले”, असंही या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून जाहीर केली आहे.