Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide: ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही घटनास्थळी पाऊस चालू असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना मदतकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे आदी नेतेमंडळीही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Raigad Irshalgad Landslide Live Today: ठाकूरवाडीवर काळाचा घाला, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली दबलं!
अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली आहे. मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मदत कार्यासाठी पुढे सरसावलेल्या संस्था- स्वयंसेवकांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
#इर्शाळवाडीदुर्घटना
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली आहे. मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू… pic.twitter.com/PdkzOMTlx0
इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही… pic.twitter.com/k5KzUFSYi8
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली असून एकूण ९३ जणांना वाचवण्यात आलं आहे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
कोकण दरवर्षी नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असतो.आणि यात मानवी जीवांचे अपरिमित नुकसान होत असते.दरवर्षी उद्भवणाऱ्या या प्रश्नाकडे आता गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.संपूर्ण कोकणात सरकारने “ऑल प्रुफ घरे” देण्याचां निर्णय घ्यावा,अशी माझी सरकारकडे मागणी आहे. तळीये गावाची दुर्घटना घडली होती,तेंव्हा मी गृहनिर्माण मंत्री म्हणून,म्हाडा मार्फत ते गाव वसवण्याचा निर्णय जाहीर केला होता.यावेळी या गावात बांधण्यात येत असणारी घरे ही विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास सक्षम बनवली होती. अशीच घरे बनवल्यास संबंधित नागरिकांना एक सुरक्षित निवासस्थान उपलब्ध होईल अशी खात्री वाटते.याबाबत सरकारने उचित उपाययोजना कराव्यात अशी माझी मागणी आहे..! – जितेंद्र आव्हाड
कोकण दरवर्षी नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असतो.आणि यात मानवी जीवांचे अपरिमित नुकसान होत असते.दरवर्षी उद्भवणाऱ्या या प्रश्नाकडे आता गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.संपूर्ण कोकणात सरकारने "ऑल प्रुफ घरे" देण्याचां निर्णय घ्यावा,अशी माझी सरकारकडे मागणी आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2023
तळीये गावाची दुर्घटना… pic.twitter.com/05quIxyzpZ
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा – राज ठाकरे
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023
दरड कोसळण्याच्या घटना या हवामान बदलाशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत बचावकार्य करणं कठीण असतं – आदित्य ठाकरे
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळून प्रचंड मोठी दुर्घटना झाली. आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांनी घटनास्थळाला भेट दिली. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या गावकऱ्यांना व मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी धीर दिला.
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 20, 2023
ह्यावेळी विधानपरिषद… pic.twitter.com/A97gOo5sBn
दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाणं राजकीय नेत्यांनी किंवा इतर लोकांनीही जाणं टाळलं पाहिजे. तिथे सापडणाऱ्या जखमींना खाली आणण्यात त्यामुळे अडथळे निर्माण होता कामा नयेत – आदित्य ठाकरे
या स्थितीत आपण सगळ्यांनीच जे काही शक्य आहे ते सगळं केलं पाहिजे. मी अंबादास दानवेंशी मी सकाळपासून बोलतोय. स्थानिक शिवसैनिकांशीही बोलतोय. सरकारी यंत्रणा आणि एनडीआरएफ इथे सकाळपासून मदतकार्य करत आहे. वातावरणातले बदल आपल्याला दिसत आहेत. अवकाळी पाऊस, गारपिटी, दुष्काळ, अतीपाऊस या घटना विचित्र आहेत. त्यावरच्या उपाययोजनांसाठी आपण तयार राहायला हवं – आदित्य ठाकरे
इर्शाळगडावर झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी इर्शाळगडाच्या दिशेने रवाना झाले आहेत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ७ वाजता इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. आता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पायथ्यापासून चालत निघाले आहेत.

पाऊस, धुके आणि निसरडा रस्ता… यंत्रसामग्री पोहोचणे कठीण असले तरी त्याची पर्वा न करता मुख्यमंत्री @mieknathshinde हे स्वतः चालत इर्शाळवाडी घटनास्थळी पोहोचत आहेत… pic.twitter.com/cKrF8z7PF8
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः पोहोचले आहेत. ज्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या तेथे मंत्री गिरीश महाजन आणि आ. महेश बालदी हे मध्यरात्रीच पोहोचले. ते दोघेही स्वतः मदत कार्यात आहेत. पाऊस आणि हवामानामुळे मदत कार्यात अडचणी असल्या त्यातून मार्ग काढला जात आहे. गेल्या 3 दिवसात सुमारे 499 मिमी पाऊस येथे झाला आहे. एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून 500 कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. राज्य नियंत्रण कक्ष सातत्याने स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे. दोन ‘अर्थ मुव्हींग मशिन’ तेथे एअरलिफ्ट करता येतात का, याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनीही फोनवर संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः पोहोचले आहेत. ज्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यात… pic.twitter.com/lPXkxr7Xq8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2023
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी शेअर केले बचाव कार्याचे काही व्हिडीओ…
रायगड जिल्ह्यातील इर्शाळ वाडी वर दरड कोसळून मृत पावलेल्या गावकऱ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली .मा मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे साहेब यांनी सकाळीच घटनास्थळी दाखल होऊन परीस्थीतिचा घेतला आढावा .रात्रभर मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री या परिस्थीतीचा आढावा घेत होते व सर्व यंत्रणेला त्यांनी… pic.twitter.com/oiy50qwUmG
— Naresh Mhaske (@nareshmhaske) July 20, 2023
रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इरसालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरसालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड पायथ्यावरून प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देण्याची शक्यता…
राज्य सरकारकडून इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तेथे मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
रात्री एकच्या सुमारास आमच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर याची माहिती आली. आमची दोन पथकं तातडीने घटनास्थळी निघाली. पहाटे तीनच्या सुमारास आमची पथकं पायथ्याला पोहोचली. पहाटे चारच्या सुमारास आमची चार पथकं वर गावात पोहोचली. तेव्हापासून या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेवटच्या माणसाला इथून वाचवल्याशिवाय आम्ही इथून निघणार नाही – एनडीआरएफ अधिकारी
दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप
रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री @ChhaganCBhujbal यांनी जाहीर केला आहे. pic.twitter.com/qNfPpmiyCi
— NCPspeaks_Official (@NCPSpeaks1) July 20, 2023
रायगड जिल्ह्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावावर दरड कोसळली. येथे जिवितहानी झाली असल्याचे समजते. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. मदत आणि बचावकार्य सुरु असून नागरीकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा कार्यवाही करत आहेत. याचबरोबर या भागातील इतर गावांना देखील सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. पुणे जिल्ह्यातील माळीण व आताच्या दुर्घटनेपासून धडा घेऊन अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने वसलेली गावे शोधून पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे ही विनंती. – सुप्रिया सुळेंचं ट्वीट…
रायगड जिल्ह्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावावर दरड कोसळली. येथे जिवितहानी झाली असल्याचे समजते. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) July 20, 2023
मदत आणि बचावकार्य सुरु असून नागरीकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या…
११ जून २०२३ – “यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय… शासन-प्रशासनाने जागृत राहावं.” – राजसाहेब ठाकरे आणि २० जुलै २०२३ रायगडच्या इरसालवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी. महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्युमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाडी-वस्तीचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ञांचा सल्ला घेऊन एक 'पुनर्वसन योजना' आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी याबाबत योजना आखावी. – मनसेचं ट्वीट…
११ जून २०२३ – "यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय… शासन-प्रशासनाने जागृत राहावं." – राजसाहेब ठाकरे
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2023
आणि २० जुलै २०२३ रायगडच्या इरसालवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी.
महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक… pic.twitter.com/oG1xhsVNOa
खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत. राज्य शासनाला विनंती आहे की, संबंधित घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर आपत्कालीन बचाव कार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांना सुखरूपपणे सुस्थितीत बाहेर काढावे. – शरद पवार
खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 20, 2023
राज्य शासनाला विनंती आहे की, संबंधित घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर आपत्कालीन बचाव कार्य राबवून…
हवाई दलाचो दोन हेलिकॉप्टर्स तयार आहेत. पण खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाहीये. सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी आहे. जेसीबीसारखी यंत्रणा वर नेता येत नसल्यामुळे अकुशल मजुरांच्या साहाय्याने बचावकार्याचे प्रयत्न चालू आहेत. एनडीआरएफचे १५० तर ५०० अकुशल मजूर घटनास्थळी बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहेत – देवेंद्र फडणवीस
वाडीत वास्तव्यास असणाऱ्या ४८ कुटुंबांपैकी २५ ते २८ कुटुंबं बाधित झाल्याचा अंदाज आहे. २२८ पैकी ७० नागरिक घटनेवेळी सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. २१ लोक जखमी असून १७ लोकांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केले आहेत. सकाळी १० वाजेपर्यंतच्या माहितीनुसार १० लोकांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं आहे – देवेंद्र फडणवीस
इरसालाडी चौक मानिवली ग्रामपंचायतीमधल्या डोंगरवस्तीत आहे. ईरसाल गडाच्या डोंगरकपारीत वसलेली वाडी आहे. तिथे वाहनं जाण्यासाठी रस्ता नाही. दूरध्वनी, मोबाईल पोहोचणे कठीण आहे. ठाकर लोकांची इथे प्रामुख्याने वस्ती आहे. हे ठिकाण संभाव्य दरडप्रवण ठिकाणांच्या यादीत समाविष्ट नाही. यापूर्वी या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडली नाही – देवेंद्र फडणवीस
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसाळवाडीत दरड कोसळली. इरसालगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मानवली गावातून पायी चालत जावं लागतं. वाडीत ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंथ्या २२८ आहे. इथे गेल्या तीन दिवसांत ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. ११.३० वाजता जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. तिथे तात्काळ प्रशासनाचे लोक पोहोचले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडमधील दरड दुर्घटनेची माहिती देणारं निवेदन पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केलं.
इरसाळ वाडीत तात्पुरते पोलीस कंट्रोल रूम, कंट्रोल रूमचा क्रमांक – ८१०८१९५५५४
आज रोजी खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी API काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे. pic.twitter.com/TF0UGDYocc
— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) July 20, 2023
पुढचे आदेश निघेपर्यंत या सर्व कुटुंबांना साखर, तूरडाळ, तांदूळ किंवा गव्हाचं पीठ या गोष्टी १० – १० किलो मोफत पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय रॉकेलही पुरवण्यात येणार आहे – छगन भुजबळ
९८ लोकांना शोधून काढण्यात यश आलं असून ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांना तिथल्या तिथे प्रथमोपचार करून सोडून देण्यात आलं आहे – उदय सामंत
मुख्यमंत्र्यांनी दिलं शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी… pic.twitter.com/ipXze5yOZu
Raigad Irshalgad Landslide Live Today: रायगडमधल्या ईर्शाळगडावरील ईर्शाळवाडी गावावर काळाचा घाला!