अलिबाग : कोर्लई येथील ठाकरे आणि वायकर कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहाजणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

भादवी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी याबाबतची तक्रार नोंदविली आहे. ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे या प्रकरणाचा पुढील तयार करत आहेत.

ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Asaram Bapu
Asaram Bapu : आसाराम बापूला २०१३च्या बलात्कार प्रकरणात दिलासा! राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
Sessions Court District Judge R G Waghmare decisions on Durgadi fort
दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश
prashant kishor
Prashant Kishor : विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अखेर बिनशर्त जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे असलेल्या जमीन खरेदी केली होती. त्यावर १९ बंगले होते. याची नोंद रद्द करण्यात आली आहे. २०१४ साली रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी कै. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासह विकत घेतली होती. या जागेवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. कै. अन्वय नाईक या घरांची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे – वायकर यांच्या नावे करावेत यासाठी पाठपुरावा देखील करण्यात आला. ही घरे ठाकरे – वायकर यांच्या नावे देखील झाली होती. त्यांची घरपट्टीही ते भरत होते. नंतर मात्र हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते लक्षात आल्यावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून २०२२ मध्ये कागदपत्रामंध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घरांची नोंदणी रद्द करून घेतली, आणि बंगले जमीनदोस्त केले असा आरोप डॉ. किरीट सोमैया यांनी केला होता. सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर काल रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उध्दव ठाकरे यांना या बंगल्यांचा हिशोब तर द्यावाच लागणार अशी प्रतिक्रीया किरीट सोमय्या यांनी यानंतर दिली.

Story img Loader