गुरुवारची पहाट कोकणासाठी दहशतीची ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचं नव्हतं. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यानंतर हळूहळू चिपळूण शहरात पूर्णपणे पाणी भरलं. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने कहर केला. रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झाला असून, पुराने वेढा दिलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत प्रशासनाला तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेशही दिले. दरम्यान रायगडमध्ये बापलेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा