अलिबाग – रेशन वितरणात पुन्‍हा एकदा सर्व्‍हरचा अडसर निर्माण झाला आहे. धान्‍य वितरणात येणारी अडचण लक्षात घेवून आता पुन्‍हा ऑफलाइन धान्‍य वितरणाला राज्‍य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. धान्‍य वितरणात खोडा येत असल्‍याने लाभार्थी मात्र वैतागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व्हर डाऊन असल्याने ई पॉस मशीन अतिशय संथ गतीने चालत आहेत. कधी कधी पूर्णपणे ठप्प होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत थांबावे लागत आहे. अनेकदा थांबूनही पॉस मशीन पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नसते. अशावेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण कसे करायचे असा प्रश्न रास्त भाव धान्य दुकानदारांना पडला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut: ‘एकमेकांच्या विरोधातील फाईल बाहेर येण्यास सुरुवात, अधिवेशनात स्फोट होणार’, संजय राऊत यांचे सुतोवाच

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु मागील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील सर्व्‍हरमधील तांत्रिक बिघाडामुळे धान्‍य वितरणात अडथळे आले होते. त्यावेळी ऑफलाईन धान्य वितरणास शासनाने परवानगी दिली होती. परंतु यावेळी अद्याप शासनाचे तसे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे.

ई पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरण करताना दुकानदारांना अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेवून सरकारने ऑफलाईन धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी. आणि लाभार्थ्यांची गैरसोय टाळावी. – प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव धान्य दुकानदार संघटना

हेही वाचा – Nana Patole: काँग्रेसमध्ये चाललंय काय? नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याची चर्चा, विजय वडेट्टीवार म्हणतात, “कदाचित…”

सर्व्हर डाऊनची समस्या राज्यभर आहे. त्यामुळे रास्तभाव दुकानात धान्य वितरण अडचणीचे झाले आहे. मात्र शासनाने अद्याप ऑफलाइन धान्य वितरण करण्यास परवानगी दिलेली नाही. शासनाच्या सूचना येताच तालुका पातळीवर तशा सूचना दिल्या जातील. – सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड</p>