अलिबाग – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघासाठी १११ उमेदवारांचे वैध अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी २२ उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरले होते. त्यामुळे ९४ उमेदवार शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

हेही वाचा – रायगड : दिलीप भोईर यांची भाजपातून हकालपट्टी

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी २३ वैध उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. ज्यापैकी १० जणांनी आज माघार घेतली, त्यामुळे आता १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १३ जणांनी वैध अर्ज केले, ज्यापैकी ४ जणांनी माघार घेतली त्यामुळे मतदारसंघासाठी ९ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. उरणमध्ये १६ वैध उमेदवार होते. ज्यातील दोघांनी माघार घेतली. म्हणून ९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. पेण विधानसभा मतदारसंघासाठी १५ वैध अर्ज प्राप्त झाले होते. यातील ८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ७ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवतील.

हेही वाचा – Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण; मनसेच्या व्यासपीठावर नव्या चेहऱ्याची ओळख!

अलिबाग विधानसभा मतदारसंघातून २३ वैध उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. यातील ९ जणांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता १४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवतील. श्रीवर्धनमधून १३ वैध अर्ज प्राप्त झाले होते. यातील दोघांनी माघार घेतली, त्यामुळे इथे ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, महाडमध्ये आठ वैध उमेदवार होते. यातील तिघांनी माघार घेतली. त्यामुळे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप प्रक्रीया पार पडली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad seven constituencies 73 candidates in the election arena ssb