लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग- कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगडने पुन्हा एकदा विजेतेपद राखले. नवीमुंबई पोलीस दल उपविजेता संघ ठरला. तर रत्नागिरी तृतीय स्थानी राहीला. रत्नागिरीची शितल संभाजी पिंजरे महिला गटात तर पालघरचा आफताब खदुबुद्दीन सय्यद पुरूष गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

४८ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे पार पडल्या. पाच दिवस खेळविल्या गेलेल्या या स्पर्धांमध्ये रायगड पोलीस दलाने २२७ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांना रायगडचा संघ विभागात अव्वल ठरला. तर नवी मुंबई पोलीस दलाने १८५ गुण मिळवत उपविजेतेपद कायम राखले. गेल्या वर्षीही नवी मुंबई पोलीस दलाने उपविजेतेपद पटकावले होते. रत्नागिरी पोलीस दल ४७ गुण मिळवत स्पर्धेत तृतीय क्रमांकावर राहीला.

आणखी वाचा-सातारा पोलीस अधीक्षकांची अशीही कर्तव्यदक्षता; महामार्गावर वाचवले दोघांचे जीव

२० नोव्हेंबर पासून खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, पालघर, ठाणे ग्रामीण सह नवीमुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस खेळाडू सहभागी झाले होते. यात नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील १३५, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील ४५, ठाणे ग्रामिण मधील ७४, रायगड मधील १६३, रत्नागिरीतील ६०, सिंधुदूर्ग मधील ७१, पालघर मधील १२२ अशा एकूण एकूण ६८१ स्पर्धकां चा समावेश होता. सात सांघिक, तर ९ वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ही स्पर्धा पार पडली. यात प्रामुख्याने हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅन्डबॉल, कबड्डी, खो-खो, क्रॉसकंट्री तसेच वैयक्तीक प्रकारामध्ये कुस्ती, ज्युदो, वेट-लिफ्टींग, जलतरण, बॉक्सींग,अॅथलेटीक्स, वू-शू, त्वायकांदो अशा वैयक्तीक खेळ प्रकारांचा समावेश होता.

स्पर्धेतील विजेत्यांना श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त मिरा भाईदर आयुक्तालय, आमदार अनिकेत तटकरे, रायगडचे पोलीस अधिक्षक, सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, नवी मुंबईचे सहआयुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Story img Loader